Thursday, December 31, 2015

1st jan


पाखरा पाखराचं एक विणलेलं जग असतं ..
कितीही भिरभीरलं तरी घरट्यातच निजतं .
                       bhavna2016.

Thursday, December 10, 2015

' ऊजी '


मी दहावीलला होते ..
ऊजी नउवीला ... माया सहावी ..येगेश सातवीला.

गावी गेलो होतो ...
छान गट्टी जमली होती आमची.
अगदी धम्माल करायचो तेव्हा.
माया आमच्यात नसायची
पण, यंदा सुट्टीला आली होती.

आज मच्छिंद्र गड चढायचं ठरवलं होतं.
सकाळी मा..बाबा..काका..काकू सोबत पायथ्याशी  कसे आलो आठवत नाही..
पण आज फार मज्जा येणार होती.
 . बहुतेक सोबत आजी असावी ..
शिदोरी पाणी सोबत घेतलं होतं.

ह्रशिकेश अगदी सात महिन्याचा असावा..
आमची वर चढताना रेस ..उतरतानाही रेसच.
ती पायवाट .. करवंदाची झुडूपं...
आमच्यासोबत
कडेवर बसून खिदळणारा ह्रशि....

कुठेही असलो तरी आम्ही दिसायची खात्री होती.
उजवला ने पोॅलियस्टर फ्लुरोसंट पिंक परकरपोळकं घातलं होतं.
अगदी त्या डोंगरावर झुडपांच्या हिरवळीत एक गुलाबी टिपका सरकताना दिसायचा.

मला आवडायचं नाही....हिने असं परकरपोळकं  घातलेलं.
तेव्हा गावी मुली वयात आल्या की परकरपोळकं घालायची पद्धत होती.
उजवला माझी आत्येबहीण.
तिच्या वडिलांनी सांगितलं आणि ती मोठ्या मुलींसारख वागू लागली.

ते काही स्वस्त नसायचं ..
एकदा हिशोब पण करून दाखवला तिला.
म्हट्लं ..
बघ !! मिटरप्रमाणे कपडा आणि  टेलर चे मिळून किती होतात..त्यात तुला दोन ड्रेस झाले असते .
तिने मात्र शांतपणे होकारार्थी मान हलविली.

मला वाटलं माझ्या  अशा बोलण्याने कदाचित तिचा विचार बदलेल.
त्यात रंगा व्यतिरीक्त कसलीच वरायटी नव्हती.
तयात ती धावताधावता पाय अडखळून पडेल की काय .. असं वाटायचं.

 स्वतः च्या  मळयातील ऊस सोडून
दुसर्याच्या मळयात चोरून तांबडा ऊस खायला घुसायचो.
ती आम्हाला घाबरवायला रानडुकराच्या गोष्टी सांगायची
आणि पळत सुटायची.
एखादी बकरी चरायला घेउन जायचो
मोकळ्या  आभाळाखाली ...
आमच्या शर्यतीत तिलाही शामिल करायचो.

ऊजीचं परकरपोळकं  ..
तिचे कपडे ..
ती एक चाहूल होती ..
ऊजवलाचं शिक्षण अपुर्ण राहणार ह्याची ..
लवकरच तिचं लग्न करणार ह्याची ...
                .....bhavna . dec2015.

Thursday, December 3, 2015

शरीरावर काही...

आपलंआपलं म्हणून कौतुक नसतं ..
कदाचित् ..
मेल्यानंतर कळतं
जेव्हा आपलं मन
एक सुंदर शरीर सोडतं ...
         ...bhavna .dec 2015.

Tuesday, November 24, 2015

तू नाहीस ....

आयुष्य सुखांनी नटलेलं ....
आणि  त्यात  तू नाहीस

दूरदूर खोलवर तुझ्याच आठवणींनी  बहरलेलं ...
पण तू नाहीस

तो ..ती. ..हा..ही ...सर्वांनीच व्यापलेलं ...
अरे !  तू नाहीस

एकएक क्षण ..वाट  पाही मन...
का कुणास  ठाऊक
तू नाहीस ...

फुलाफुलांवरून भिरभिरणारं
मोहक सुगंध पसरवणारं माझं मन...
त्यात तू नाहीस ?

पुस्तकाचं पान उलगडावं तसा
'तू' उलगडत जातो आहेस

अवतिभवती माझ्या
सारं सरं 'तू' आहेस.
                bhavna. nov. 24.2015

Sunday, November 15, 2015

' paris ' माझ्या आगामी पुस्तकाची ही पहिली ओळख.

 
2007 साली मी अनुभवलेल पॅरीस...
विविध कलांनी नटलेलं हे शहर.
जगातील प्रत्येक कलाकाराने एकदातरी भेट द्याव असं हे शहर..
कला आणि विज्ञानाचं सुंदर एकत्रिकरण असलेलं हे शहर ...
प्रत्येक गल्लिबोळाचं वैशिष्ठय असलेलं हे शहर ...

शहराच्या मधोमध वाहणारी सिएन नदी ...
त्या कडेने चालत राहा ...
विंडो शोॅपिंग करा ...
शनिवार च्या ओपन मार्केटना भेट द्या ...
छोटीमोठी कला दालनं पाहत फिरा ...
रसत्याकडेने विकत मिळणारी पुस्तकं चाळा ...
माझ्या चित्रांमधून वेळ मिळाला की हेच काय ते काम.

निटनेटकं असं हे शहर...छान प्लॅनिंग ...
एखादी महत्वाची इमारत गर्दीत अशी रचलेली आढळेल की लांब गेल्यावरही स्पष्ट दिसत असेल.

दुरवर कुठेही गेलं तरी आकाशात डोकावणारं ते Eifiel tower ...
ती छबी मनामध्ये घर करून राहिली ... भारतात परतल्यावर आजही एखादं टाॅवर मला tour eifiel ची आठवण करून देतं.

शनिवारी नदीच्या काठी गीटार , मित्रमैत्रीणी , वाईन आणि रात्रभर चालणार्या गप्पा.
सकाळसंध्याकाळ माझ्याच इमारतीत सुरू असलेला पियानोचा रियाज ...
दर अठवड्याला होणारे गायन ..वादन.. नृत्य...
जगातील विविध देशातील कलाकार ...
हे सर्व अनुभवायला माझ्यासाठी अडीच महीने खूप कमी होते.

कधी प्यायला मिनीरल वाॅटरची गरज भासली नाही ..
स्वच्छ  रसते ...
रसता चालत क्राॅस करणार्याला मान देणारी वाहने...
खेळणीची दुकानं लाकडी चाविच्या खेळणींनी भरलेली ..
रसत्यावरून मालकांसोबत मास्क लाउन फेरफटका घालणारे कुत्रे ..
स्केट्शूज घालून फिरणारी फ्रेंच माणसे ...

वयस्क सहसा फक्त फ्रेन्च बोलत ..जणु इंग्रजी येतच नाही.
पण तरूण पिढीमध्ये ही औपचारिकता  कमी  दिसली.

कोणत्याही कलाकाराला हवंहवस वाटेल असा हा अनुभव
आणि प्रत्येक मनुष्याला ओढ लागेल असं हे वातावरण...
माझं ड्रीम कला महाविद्यालय , Ecole art de Beaux देखिल काही दिवस अनुभवायला मिळालं .
तेथील लायब्ररी मध्ये एक संपुर्ण कपाट भारतीय कलाकारांनी व्यापलेलं पाहून मन भारावलं.
पॅरीस ...जगातील महत्वाचं  कलेचं प्रेरणास्थान ..

म्युझी दी लुव्र , म्युझी दी ऑरसे , पोॅम्पीड्यू , पिकासो म्युझियम ..
हे सर्व पहायला मी  सियन नदीकाठून चालत जायची ...
तेथे पोहोचेपरियंत नेहमीच स्वप्नमय वाटायचं .
परतिच्या वेळी त्या कलाक्रूतींमध्ये मन अगदी एकरूप होउन गेलेल असायचं.
रात्री इथल्यागत तिथं अंधार झालेला दिसला नाही.
काही दिवसातच 'सातच्या आत घरात' हा नियम मी मोडीस लावला.
उशीरा परतताना वाटणारी भितीही नाहिशी झाली होती.

हे असं एक शहर
ज्याने अशी अमानुषता कधीही पाहिली नसावी ...
त्या शहरात कोणी अशी क्रूरता करेल ही कल्पना देखील असहय्य आहे.
                                         ........bhavna sonawane .2015.
Tuesday, October 20, 2015

बेरीज वजाबाकी

साचल्या क्षणांची बेरीज
विसरल्या क्षणांची वजाबाकी

प्रेमाची बेरीज
प्रेमाची बेरीज
तरी प्रेमाची वजाबाकी
 
भावनांची बेरीज
भावनांची वजाबाकी
पैशाची बेरीज
पैशाची वजाबाकी

मिळकतिची बेरीज
साठलेल्या तुकडयांची बेरीज
खर्चाची वजाबाकी

जगण्याची बेरीज
हसण्याची  बेरीज
रडण्याची वजाबाकी

सुचलेले प्रश्न
प्रश्नाची बेरीज
त्यातुन सापडलेली उत्तरं
प्रश्नांची वजाबाकी

नात्यांची बेरीज
तुटलेल्या नात्यांची वजाबाकी
नात्यांची बेरीज
जोडलेल्या नात्यांची बेरीज

त्या आठवणी
आठवणींची बेरीज
आठवून आठवून साठवणांची बेरीज

साठलेली बेरीज  अधीक  बेरीज
ते सरणारं आयुष्य
तारुण्याची वजाबाकी

सरणारी वर्ष
तारुण्याची वजाबाकी
तरी जगलेले क्षण
जोडलेल्या क्षणांची बेरीज ...

क्षणक्षण करत साठलेली वर्ष
त्यात ते उरलंसुरलं आयुष्य
शोधाशोध करून सापडलेला आनंद
जगायला शिकवणार्या श्वासांची  बेरीज

जाताना सोबत तो सर्व हिशेब
साठवणांची  आठवणींची
ती बेरीज वजाबाकी.....
            .....bhavna october 2015 .

Friday, September 25, 2015

..

ये न समझना कि नादां है हम ...
तेरी गलतियां भूलानेकी आदत है हमारी  !!
                           ....bhavna.

..

कसंका होइना जगत रहावं ..
काट्यांमधुनी फुलत रहावं !!
          ....bhavna

Sunday, September 20, 2015

story of a life ...

आयुष्य कधी चिंब पाण्यात भिजवावं...
कधी एखादं पान उलगडाव .
साठलेली धुळ पुसून टाकावी
कुठे वाळवी दिसलीच तर तो भाग अलगद फाडून टाकावा ...

अवघड आहे , जगलेले क्षण आपल्यापासून असे मोकळे होणे
पण करावं...
मग जगण्यातला हलकेपणा जाणवेल
नवे पंख लावून पुन्हा उंच झेप घ्याविशी वाटेल
पाण्यातून कुठेतरी खोल पोहत जावंस वाटेल ...
मैलोंमैल चालावस वाटेल ...

कदाचित ते डोंगर ..दरी पार केल्यावर नवं गाव बसवावसही वाटेल ..
करुन पहावं
एक जगणं जगून झालं की नवं काही शोधावं
येतील त्यांना सोबत घ्यावं

एका ठिकाणी स्वास कोंडू लागला की पहाटेच निघावं..
एखाद्या लमाणी सारखं रंगीत होऊन पहावं...
मला माहित आहे तुला ते शक्य नाही
म्हणून निदान स्वप्नात रमावं
तिथेच हरवावं...
                                 ......bhavna

Sunday, September 13, 2015

आपण दोघे ...

ते आकाशातले तारे
एकसंघ तरी एक न होणारे
तू तिथे मी ...मी तिथे तू ...
तिथेच ...तसेच..वर्षानुवर्षे ..
न जोडले जाणारे ..
न दुरावलेले
आपण ते दोघे ..
ते तिथे ...
कधी एक न होणारे...
ते कायम चमचमणारे ...
          ....bhavna.

Friday, September 11, 2015

...

अडीच वर्षाची स्कारलेट ...
काही सुचत नव्हतं नी समोरच असलेल Vincent Van Gogh ...
कलरफूल चित्रांच पुस्तक ....
सगळी चित्र तिला एक्सप्लेन केली .
काय समजलं असेल तिला ?
तो heavy yellow ...
तो fresh blue ...
to dull red ...
ते त्याचं auvres चं yellow house  ...
ते cyprus trees ...
ते self portraits ..
तो त्याचा bandaged ear ...
ती दुःखी बाई ...
तो रडणारा माणूस ...
ते windmill ..
ते गरीब potato eaters ...
the Sunflowers ...
सर्वंच कळलं की ...
आणि भरभरुन केलेल रंगलेपन ..!!

Tuesday, June 16, 2015

Gulmohar

आज पुन्हा एकदा
पाऊस नभी ढाटलेला
त्या वळणावर
तो गुलमोहर
चिंब भिजाया आसुसलेला !
               bhavna 2014.

Saturday, June 6, 2015

वाट ती मरणाची

आठवाविशी वाटतात
पुन्हा ती पावलं
चालावस वाटतं
पुन्हा त्या रसत्यानं ...

अनुभव घ्यावासा वाटतो
त्या अवखळ बालपणाचा
जीव द्यावासा वाटतो
त्या खडतर मोठेपणाचा

म्हणून शोधतेय मी वाट त्या मरणाची
पुन्हा जन्म घेऊन
लहान म्हणून वावरण्याची !!
             bhavna 1995

Monday, May 25, 2015

अधुरं

एक स्वप्न अधुरंच रहावं
राहूनराहून आठवावं
आठवणीतून जपावं 
जगणं होऊन जगावं !
          ...bhavna.may2015.

Thursday, May 7, 2015

भेट एकदा ....

पाऊस जरा भेट ऐकदा ....
मोर पिसारा होऊन भेट
बेधुंद वारा होऊन भेट
गार गारा होऊन भेट
फक्त माझा होऊन भेट
भेट एकदा....
             .....bhavna 2015.may.

Sunday, March 29, 2015

' तू '


 उथळ पाण्यासारखा संथ कधी तू
झर्यासारखा कधी खळखळणारा

मनसोक्त भिजवणारा पाऊस कधी तू
चिंब भिजूनही कधी कोरडा वावरणारा
 
लाटांमध्ये वाहून नेणारा समुद्र कधी तू
मेघ जसा कधी मनसोक्त बरसणारा

बरफाळलेल्या नदीसारखा शांत कधी तू
एक दुष्काळ कधी मन माझं जाळणारा

खोल  किती आहेस तू जाणीवही न देणारा
तु हा असा... कधी तू तसा ....

आणि हो... डोळ्यातील अश्रुही तू
क्षणोक्षणी ओघळणारा.
                     .....bhavna
                         feb 2015.

Thursday, March 5, 2015

रंग....


पुरवी एकदा एका लमाणिन ला पाहून वाटल होत
आपणही होउ असे रंगीत प्राणी कधी....
तो रंगीत घागरा
ते रंगित दागिणे पाहून मन भारावून जायचं...
 केमिस्ट्री लॉब मध्ये कधीतरी फ्लूरोसंट कलर दिसायचे
त्याचही आकर्षण होतं
कालांतराने हातामध्ये रंग पेटी आली
आणि पहिलं प्रेमही रंगांवरच जडलं
रंग शिकत असतानादेखील रंगपंचमीची  ओढ होती
तातपुरत रंगीत प्राणी झाल्यागत वाटायच खरं
पण आता रंगांशी इतकी बांधली गेली आहे
की तेव्हाची रंगीबेरंगी मिरवून मन भरलं
झोपेतून उठलं की रंग
झोपायच्या आधीही रंगच
पाणी समझून कधी ब्रश पाण्यात असतो
कधी बिसकीटच पाण्यामध्ये तरंगत असतं
सध्या माझं जग ईतक रंगमय झालं आहे
की पुढे आयुष्यात इतर गोष्टी उरो न उरो 
 ........उरतील ते रंगच .
                           .......bhavna march 2015.

रंग....


पुरवी एकदा एका लमाणिन ला पाहून वाटल होत
आपणही होउ असे रंगीत प्राणी कधी....
तो रंगीत घागरा
ते रंगित दागिणे पाहून मन भारावून जायचं...
 केमिस्ट्री लॉब मध्ये कधीतरी फ्लूरोसंट कलर दिसायचे
त्याचही आकर्षण होतं
कालांतराने हातामध्ये रंग पेटी आली
आणि पहिलं प्रेमही रंगांवरच जडलं
रंग शिकत असतानादेखील रंगपंचमीची  ओढ होती
तातपुरत रंगीत प्राणी झाल्यागत वाटायच खरं
पण आता रंगांशी इतकी बांधली गेली आहे
की तेव्हाची रंगीबेरंगी मिरवून मन भरलं
झोपेतून उठलं की रंग
झोपायच्या आधीही रंगच
पाणी समझून कधी ब्रश पाण्यात असतो
कधी बिसकीटच पाण्यामध्ये तरंगत असतं
सध्या माझं जग ईतक रंगमय झालं आहे
की पुढे आयुष्यात इतर गोष्टी उरो न उरो 
 ........उरतील ते रंगच .
                           .......bhavna march 2015.

Sunday, February 22, 2015

...


 तुला सोडून आले मी खरी ....
आता परतायचा विचार आहे !
जगणं कठीण केल होतस तू ....
आता मरतच जगायचा विचार आहे !!
                    ...bhavna

Tuesday, February 10, 2015

मातिचा सुगंध तो ....


 मातिचा सुगंध एकदा
गंध पावसाचा हवा होता
माझ्यासाठी ....त्या चित्रासाठी
तो.... मला हवा होता

मन वेडं शोधत रहायच
गल्लीगल्लीतून शोधायचं
एका पहिल्या पावसातला ' तो '
मन माझ्याच चित्रांमध्ये शोधायचं...

माझ्या प्रेमात वेडा कधी
कधी एक गुलमोहर तो...
बरसणारा पाऊस कधी
कधी मोगर्याचा सुगंध तो

आठवणीतला बहर कधी तो ....
मला त्याचा सुवास सापडला
एका बोहरीच्या दुकानात
मला ' तो ' बंद बाटलीत सापडला

चक्क विकत मिळाला...
' मिट्टी का सुगंध पावसाळी '
हो कालच मला ' तो '
एका चोरबाजारात सापडला.....
          ....bhavna.

Thursday, February 5, 2015

एक आठवण.....

वर्ष २००४ ..०५... मी चित्रकला महाविद्यालय मध्ये असिस्टंट लेक्चरर होते तेव्हाची एक आठवण.
माझ्या ए.टी.डी. वर्गात सर्वच विद्यार्थी एकमेंपेक्षा भिन्न तरी वर्गाची एकी होती. मागे कोपर्यात एक शांत स्वभावाची मुलगी बसायची. 'ती' साधी निटनेटकी आणि सर्वात प्रामाणिक होती. इतकी की सकाळी वर्गात करायला दिलेली तिची असाइन्मेन्ट बर्याचदा संध्याकाळी पुर्ण झालेली असयची. त्या गडबडीत तिचं बरचस काम छान होत नसून बरं व्हायचं.

कधी सुट्टी न घेणारी मुलगी एक दिवशी वर्गात दिसली नाही.कॉलेज परिसर तसा लहानच .नेमकं तिला कोणीतरी स्टेशन जवळ मित्रासोबत फिरताना पाहिलं होतं. दुसर्या दिवशी आम्ही शिक्षकांनी तिची थोडी फिरकीही घेतली.
तिचं प्रेम तिच्या अप्पांना माहीत होतं. त्यांनी शिक्षण झाल्याझाल्या त्या मुलाशी लग्न कृरून द्यायचं ठरवलच होतं. बस ह्या गोष्टीत आणखी काय हवं होतं ?
त्या वर्षी मी ती नोकरी सोडली आणि वार्षीक परिक्षेआधीच सोडली. परिक्षा झाल्या आणि ए.टि.डी. च्या मुलांशी बरीच वर्ष काही बोलणंच झालं नाही.
आज अचानक  तेथील विद्यार्थी आठवले ...'ती' आठवली....
    
असंच एकदा एका विद्यार्थयाकडून कळालं ...नंतर अप्पांनी तिचं लग्न त्या मुलाशीच करुन  दिलं . एक मुलही झालं ...आणि अवघ्या दीड ..दोन वर्षात एक दिवशी तिला तिचा नवरा व सासरच्या माणसांनी जाळून ठार मारलं. मला खरतर रहावलं नाही पण ती घटणा घडून दोन वर्ष झाली होती. आणि कित्येक वर्ष मला खरंच वाटत नव्हतं . आजही अशा घटणा आपल्या अवतिभोवती घडताहेत ह्यावार विश्वास नव्हता.

ती इंस्टिट्यूट आठवली ...मी शिक्षिका आठवले ...तो वर्ग ..ते बारावी पुर्ण करुन ऐ.टी.डी. शिकत आसलेले विद्यार्थी  आठवले. आणि मागे कोपर्यातला तिचा निरागस चेहराही आठवला.
असं कसं झालं ...का झालं ... ह्यापेक्षा इतक्या प्रामाणिक  मुलीबाबतीत असं घडलंच कसं हा प्रश्न पडतो.
जे काम सांगू ते निमूटपणे करणारी ही मुलगी.
का तिच्या जगण्यात तिची  प्रामाणिकता आड आली ... माहीत नाही
तिनं तिचं प्रेम ... पुर्वीच गुंडाळून ठेवायला हवं होतं.

मी पुर्वीपासूनच स्वच्छंदी मनस्वी ...
 माझ्या विद्यार्थिनी बाबत असं काही घडावं ...हे दुःख !!
                             bhavna

Sunday, February 1, 2015

' द व्हॅनिशींग पॉईंट '


 जे माझ्या नशिबी आहे ते माझं,
जे तू मिळवलं आहेस ते तुझं ....

आपण दोघेही एका समरेषेत चालत राहू
पुढे काल्पनीक बिंदूवर एकत्र येऊ
जरी वास्तवाशी काहीही संबंध नाही
एकमेकांचा शोध मात्र सुरूच ठेवू

त्या विलय बिंदूवर
('द व्हॅनिशींग पॉईंट') वर  एकरुप होवू
तोच तो शेवट ... आणि तिथेच थांबू !!
              .....bhavna jan 2015.