Monday, August 30, 2021

He defines Love



 A beautiful feeling  that someone stays in theheart ... 

no matter what he was ...

no matter where he is ... 

Its something that keeps us glowing

 in togetherness and in despair.

Its the heart filled of you  .. 

attracts me ..myself  more .. 

then my life is easier ... 

Yes ... the pain you created

still keeps my mind awake ... 

you deep felt inside

keeps me awake ... 

still .. distills the hatred away! 

and what stays is the pure  Love !! 

Yes ..  I feel Love ....

Krishna Krishna ... 

                     ........bhavna.

Monday, August 16, 2021

वो राह अंजानी ...

 ती .......... 

जुनी पण परिस्थिती आजची ... 

कदाचित आता कायमची ! 


अंजानी मंझील 

अंजानी गलियॉं 

वो राह अंजानी 


अंजानी उन सुर्खियोंमें 

अजनबी तूम ..

अजनबी हम .. 


एक ख्वाब अधुरासा 

एक शाम धुंदलिसी

वो बढ लहा अंधेरा 

वो खत्म हो रहा .... शुरज कहीं 


उन अजनबी चेहरों के बीच 

कुछ जाना कुछ पहचाना

एक खिलखिलाता चेहरा 

वो मासूम जिंदगी 


एक मासूम अब तैयार खडी 

अंजानी राह पर 

अंजानी सफर की ओर 

एक अजनबीसी .....


Bhavna


Thursday, July 22, 2021

जिवाचा वेनाइस करावा म्हणतेय ...

 


जिवाचा वेनाइस करावा म्हणतेय ...

 माझ्या राहत्या शहरामध्ये आता बोटीसाठी रसते करायला हवेत. 

तसेही येथे बस सेवा चालत नाही. शिक्षावाले बस बंद पाडतात. रिक्षा परवडत नाही. 

मग ओपन बोट एरवी त्या ठरलेल्या रसत्याने कृत्रीम रित्या पाणी साठवून तर कधी चाकावर चालवावी. मग आम्हालाही विरंगुळा .. मुलांना मज्जा. 

अगदी लेक व्यूह प्रमाणे बोटीचे स्वागत करू.  पाऊस सुरू झाला की तीच बोट आणि तोच रसता .. आता पावसात पाण्यात प्रवास करावा...  

माझे इंजिनीयर डोके नसून कलाकार डोके आहे .. त्यामुळे समजून घ्या. ट्रोलर्स ने ह्या पोस्ट पासून कृपया लांबच रहा. 

 बोट रसत्याचे चित्र समोर दिसतय ... मग ते स्वप्न का असेना. नवनवे स्वप्न दाखवणे आपले कामच असतय बघा... जणू पावसात जिवाचा वेनीस Venice. 

भारताबाहेर असतात की सायकल साठी ठरावीक रसते .. मग येथे बोटीसाठी रसते डिझाइन करता आले तर ... 

जागेची पंचाइत होइल .. तरी ज्याला हे पटेल .. जमेल .. त्याने उचलून धरावे. 

आता बोटीसाठी रसते करावे ! 

Happy and Safe Rains ... 

        ........bhavna. july21.

www.bhavnasonawane.com

Thursday, January 28, 2021

एका पडलेल्या दाताची कहाणी 😂


ती : आई माझा फर्स्ट मिल्क दात तुटून बेसीन मधे पडलेला ना ..
हा बघ ... हा वाला आता मी उशीखाली ठेवणार. 
मग मला फेरी गिफ्ट देणार !!

मी : नको .. फेरी ला सांग पैसे दे. 
ती: नाही फेरी गिफ्ट देते आणि पैसे पण देते

मी : काही नाही .. पहिल्या दाताला गिफ्ट देते असेल. 
आता पुढच्या दातांची किंमत कमी होते नै ... 

ती: पैसे चालतील की 
ओके .. जे देइल ते देऊ दे. 

(रात्री झोपताना उशीखाली ठेवलेला दात सकाळी तसाच होता)
ती : ए आई ... फेरी मला विसरली 
मी: थांब जरा .... तिला कामात लक्षात राहिले नसेल. 
उशीरा येणार असेल.  

(दुपारी पंनास पन्नास च्या दोन नोटा उशीखाली सापडतात)

ती: आय ..आई  बघ .. फिफ्टी प्लस फिफ्टी ... हंड्रेड 
मी: अरे व्वा ...

ती: पण गडबड आहे. 
हे पैसे तुझे तर नाहीत? फेरी असे पैसे देत नाही. 
दात पण घेऊन जाते. 

मी: मला ते नाही माहीत ... आमच्या वेळेत फेरी तुटलेला दात कधीच विकत घ्यायची  नाही ... 

ती: अगं पण दात तसाच ठेवला तिने. 
मी: बरं ... ती विसरली असेल. नेइल. 
ती: नाही विसरत नाही. मी मातीत टाकते आता तो दात. 
मी: मग बर्याच पोरांचे दात जमा करून वजनाने दमली असेल. नाजूक असते नै ती...  उद्या नेईल. तू नको टाकू ... पैसे गायब झाले तर... 
ती: ओके .. पण तरी गडबड आहे. ही कामे ती रात्री करते. 
मी: अगं ... आपण कसे पैसे देउन तसेच घरी येतो अन् विसरलेली  भाजीची पिशवी सकाळी  आणतो .. तसं झालं असेल बघ. 
येईल येईल परत ... 
ती : बरं ..वाट बघते. 
मी: माझ्या रूट कॅनलची कॅप निघालीय ...ती सिरॅमिक कॅप घेईल का? 
ती: दे ... तिला खरा दात वाटेल. 
 मी: किती पैसे देइल? 
ती: मला हंड्रेड दिलेत ... तुझा दात मोठा आहे .. टू हंड्रेड देईल. 
मी: नक्की? 
ती: म्हण्जे काय .... देइल ती. 

(सकाळी ) 
ती: आई आई .. बघ माझा उशीखालचा तो दात गायब झाला ... 
फेरी घेऊन गेली दात. 
मी: मला सांग .. इतके दात जमा करून फेरी त्याचे करते काय ?? 
ती : दाताना जोडून तिचे घर बनवते.
मी : 🤔🤔🤔