Friday, December 13, 2019

एका मित्राला लिहीलेले पत्र



' गेली वीस वर्ष चित्र थांबली आहेत म्हणून सतत रडणार्या मित्राला लिहीलेले पत्र '

सतत रडत असतोस.

नोकरी ..घर ..बायको ..मुलं ... सर्वच कसं छान आहे तरी चित्र काही जमेनात.

चित्र शिकला आहेस. गोल्ड मेडल मिळवल आहेस ..एक वर्ष मेरीट मिळवलयस ...

पण कित्येक वर्ष चित्र जमत नाहीय .... पुरेसा वेळ नाही हे कारण देतोस ..हे अगदीच खोटय ...
जो वेळ आहे त्या वेळेतही मेंदूसोबत भुसा भरून ठेवला आहेस.

देवावर तुझा विश्वास नाही ..नसूदे ..कदाचीत विश्वास असता तर एकाग्रता समजवायला सोपी झाली असती ....पण असो...

पं जसराज ..किशोरी अमोणकर ..पं. भीमसेन जोशी ...जगजीत सिंग ... शंकर महादेवन ... वगैरे ऐक. सुफी काही ऐक . संपुर्ण स्टुडीओत ते नाद घुमू देत. हो पण हा अनुभव एकट्यानेच घे ...

मी ब्लॕंन्क झाले की ह्यांची  कृष्ण ..मिरा ...विष्णु ...विठ्ठल स्तोत्र ...भजन ..स्तुती ऐकते.

त्याकरीता स्टुडीओत चांगला स्पीकर असतो ... हल्ली मी स्टुडीओत आहे हे शेजारच्यांना त्या भजनांवरून समजतं ..
एक पंचहात्तरीला आलेली म्हातारीही दाराबाहेरच्या जीन्यात मी दार उघडायची वाट पाहत दुपार संध्याकाळ घुटमळताना दिसते.
मी अजून आत बोलावले नाही तिला कधी .. मला भिती आहे .. तीही माझ्याप्रमाणे कधी स्वप्नमय व्हायची ....

तर.. सतत ऐकत रहा ...तासन्तास ..जे आवडेल ते ..
समोर पेपर ..कलर ... कॕनव्हास .. फक्त मांडून ठेव...पाहत रहा ... तेथेच लोळत पड ..

काम करायला घेऊ नकोस पण त्या पांढर्या शुभ्र चौकोनी आकारावर एक ..अनेक स्वप्न पहा ... तेथेच झोप थोडावेळ ..एक छान डुलकी घे ...
पुनः तो आकार न्याहळत बस ..तासन्तास ..

तरी काम करू नकोस.

असे काही दिवस कर ...हळूहळू  इतर विचार बाहेर पडतील ...
हळूहळू अनावश्यक स्वप्नही चाळणीतून मोकळी होतील  आणि तुला तुझी खरी स्वप्न ..विचार सतत तेथे दिसत राहतील. ती काही काळ सोबत देतील अशी असतील.

आता ती स्वप्न सोबत ठेव . ती तेवढीच पुरेसे आहे ..एक अख्खी सिरीज घडवण्याकरीता... कदाचीत पंचवार्शीक काय ते ..असतं नै ...त्याप्रमाणेही टिकतील ...
किंवा कदाचीत आयुष्यभर पुरेल ...असंही काही असेल त्यात.

माझी स्वप्न मात्र साधीच असतात ... तरी माझ्या चंचल मनाप्रमाणे सिझनल असतात हं ... मग तो कॕनव्हास सिझन प्रमाणे बदलला तरी पुढच्या सिझनला वळून नव्यासोबत जुनाही पुर्णत्व अनुभवतो ...

जेथे जेव्हा ऊन असतं तिथे ऊन्हाळा हवा ...पावसात जणू ओलंचिंब व्हावं ..नाचत रहावं एखाद्या मोराप्रमाणे.. थंडीत गारगार वातावरणात एखादं लाल भडक परकर पोळकं नेसून लहानगं होऊन धावत सुटावं त्या धुक्यात डोंगरावर ...

लक्षात असू देत ..ही माझी स्वप्न आहेत ..तू तुझी पहा ..उगाच स्वतःची स्वप्न समजून उचलगिरी करू नकोस हं ..

हे आकार असतात स्वप्नात ...अंतरमनात ..

पण तुझ्या कॕनव्हासवर उतरताना ते आकार बांधून ठेऊ नकोस.

 मात्र  ते रंग उतरतील ..ते भाव उतरतील ...तो कानाला सतत ऐकू येणारा एकच नाद असेल कदाचीत ...तेथे आकार नसूनही संपुर्ण चित्र कोणालातरी खोलवर त्याच्याच आंतरमनात घेऊन जाइल ...कदाचीत.

हे सतत करत रहा ..
तासन्तास ..दिवसेन्दीवस ..वर्षोन्वर्षे .. मग थांबणे शक्य होणार नाही मधली वीस वर्षे जणू जगायची राहिली होती तीही एकत्रीत जगशील .... आयुष्य नक्की वाढेल.

आणि हे असे सोपे काही जमणार नसेल तर फक्त नोकरी सांभाळ ... आयुष्यभर झीज ... चित्रांचा विचार सोड.

         ......©Bhavna Sonawane.dec. 2019.

Tuesday, December 10, 2019

सराव आणि वर्ष

आधी साधा कार्ट्रीज कागद ..आधी कटरने टोक केलेली  पेनसील ..त्यानंतर कागदांचे विविध पोताप्रमाणे प्रकार ..सराव ...
कला अनुसरून वेगवेगळ्या विषयांचा भडिमार ...
सोबतीला विविध रंग व रंगलेपन माध्यमं ... 
आणि हे सतत रोजचे साधारण पाचसात तास ...
कसंतरी सरणारं पहिलं वर्ष ...

तरी पुढेही पेन्सील घासूनघासून केलेला सराव ..
वर सराव कमी पडत असल्यामुळे शिक्षकांची बोलणी ..
 तीनएक वर्ष हीच विद्यार्थी दशा ...

नंतर कधीतरी कॕनव्हास .... कॕनव्हास म्हणजे थोडसं प्रोफेशनलीझम पाळण्याइतपत आपली लायकी होत चालल्याचे समाधान.
तेव्हा अधूनमधून शिक्षकानी थोपटलेली पाठ ..

तरी ..आपण अजून चित्रकार नाही हं ...
एकदाचे शिक्षण संपले.
आणि आजही कुठेतरी कलेचा विद्यार्थी म्हणून कलेची अर्धवट जाणवत राहणारी उपासना ...
आता सराव आहेच पण भितीनेही ती पेनसील पुनः हाती घ्यायला भाग पाडतो मी ..

आजही मी अपुर्ण ..
ते अपुर्णत्व नव निर्मिती करायला भाग पाडत.

आणि अशा वेळेस
 कोणीतरी युट्यूब विद्यारथी भारीच शॉर्टकट मारून आपल्याला जेव्हा कलेचे लेसन देतो ...
तेव्हा समोरच्याचे म्हण्णे नुसते ऐकत रहावे ..

मज्जा येते नै !!
                     ...... Bhavna Sonawane.

Monday, November 11, 2019

ती कापलेली फांदी

त्या स्वच्छंदी झाडाला समजावलं
त्याची फांदी कापली
अन्
झाडानेही आकसून घेतलं स्वत:ला ..

हो ..इतरांनाही जगू द्या म्हणत...
तेथील विस्तार काही काळ थांबवत
स्वत:ची वाढ न खुंटता ..

माणूस मात्र मी मी म्हणत ...
विस्तारत चाल्लाय ..
प्रगतीच्या नावावर !
              bhavna.november.2019.

Saturday, October 5, 2019

आरे ..Aarey

सांग देवा कसंकाय विसरायचं ...

जगण्यातील बरेच आनंदी ...

आरेतील सावलींनी व्यापलेले हे क्षण....
कोपर्यातील एक उरलीसुरली आठवण ..

त्या डांबरी रसत्यांवरील वीसपंचवीस चा स्पीड ..
सुरूवातिची विजय सुपर ...
तर् नंतरची पद्मिनी फियाट ...
बस हेच काय ते अंधूक अंधूक ...

आणि त्या पसरलेल्या  सावलीमय रसत्यावर
कधी सांडलेली शुभ्र कामिनी
तर् कधी पिवळा केशरी गुल्मोहर !
                           .....bhavna.2019.5sept.

Wednesday, September 18, 2019

Thursday, August 8, 2019

जीवन

नखा एवढा जीव माझा ...
त्याच्या गरजा त्या किती !
जीवन आहे तोवर मौज ...
मरणोत्तर माती !!!
      ....bhavna. 2013.

Saturday, July 6, 2019

पाऊस आणि गोकर्ण


उन्हाळ्यात खूप खूप बिया आल्या 
काही काढल्या
काही मातीत स्वतः पडून रुजू झाल्या
तरी वेलीवर काही उरल्याच

पाऊस सुरू झाला
तशी कुजायला सुरूवात झाली
पण बियांची देखील जीद्द न्यारी

 मिळेलपाणी जोवर
 तशाच अवस्थेत तोवर
नव्याने झुलत रहायचे म्हणताहेत

एवढे धीट ...
एक एक सुटं कर ..
नी रूजायला जागा कर
आता मलाच खुणावताहेत !
          ...... bhavna.

Monday, June 17, 2019

Chantal Jumel ही माझी फ्रेच मैत्रीण. हिच्या चित्रांमध्ये मला माझा भारत नव्याने सापडतो.

 चांतलशी माझी ओळख साधारण चार वर्षांपुर्वी तामिळनाडूच्या तिच्या चित्रप्रदर्शनात झाली.
पातळ लाइफसाइज राइसपेपरवर लालसर पेन नी संपुर्ण  ओँकार .. त्यातच आकार ..माणसे .. प्राणी पक्षी ..पाणी ..आकाश ... सहसा बहाय्य रेश नाही ..

टिपीकली फ्रेंच शरिरयश्टी तरूणपणात 1980 मध्ये दक्षिण भारतात राहून शास्त्रोक्त पद्धतिने कथकली नृत्याचे शिक्षण .. लेखन ... तसेच कालांतराने चित्रणही ..करत असलेली चांतल.

चित्रात कुठेही बटबटीतपणा नाही ... लय ..ताल .. एकसंघता .. सुसंगती .. किती साधेपणाने दर्शविते .. तरी चित्र संपुर्ण वाटते.

जितकं नाजूक ..लयदार .. तितकच प्रभावी  ...
जरी  शांत ..तरीही  फिरत्या रेशा ...

कुठेही आकारांचा दिखावा नाही ..सरळ साधेपणाने जसे भावले तसे रचलेले आकार ...

 I am basically a writer म्हणत चांतलने तिची ओळख सांगितली होती. अर्थकलर मधला चुढीदार ...ओढणी ..मोठे रिंगा व कधीकधी टिकली हा तिचा पहराव.

काही वेळाने  एकच अक्षर गिरवत गिरवत मला मेडिटेटीव  फिलींग येतं म्हणाली .. आणि तो राइसपेपरही असाच व्यापला जातो.
हे सुरूवातीला साधं वाटलं तरी लक्ष ....दशलक्ष वेळा ओँकार लिहीणं ..म्हणजे नकळत तेवढा उत्चारणंही आलंच.

आणि समोर त्या पातळ राइसपेपर च्या पोतावर दिसू लागतं ते भारताचंच रूप.

चांतल वर्षातील काही महीने तामिळनाडूत राहते तर काही महिने फ्रांस ला असते . भारतात पारंपारीक दाक्षिणात्य ठिपक्यांची  रांगोळी चा अभ्यास करते ..ते देखील अगदी लयीत तिच्या चित्रांमध्ये उतरवते .. तर फ्रांसमध्ये घराच्या बगिच्यातील फुलझाडांमध्ये स्वतःला वाहून देते.

किती छान वाटतं ना हे ऐकायला .. एखाद्या कलाकाराचे आयुष्य ..मस्त जणु भिरभीरणारं ..पण  प्रत्येक बहाय्य सुंदर दिसणार्या कलेच्या मागे साधना व खडतर प्रवासही  असतो.
त्याच्या साध्या सरळ निर्मळ आकारात व अल्हाददायक रंगात जणु तो आयुष्याचा खडतरपणा लुप्त होतो...

खरंच आपल्यातला हरवत चाललेला भारत कधीकधी अभारतीय कलाकारांमध्ये नव्याने  सापडतो.
 ....... Bhavna Sonawane






Tuesday, April 9, 2019

मृगजळ

www.bhavnasonawane.com

तू पुनः कुठेतरी भरारी घेतोस तसंहे सावरलेलं मन
तुझ्यामागे धावू लागतं ...
बघ मृगजळ आहे हं तो ,
शरीराची एक एक नस
मनाला समजावत असते ...
पण तहानलेल्या जीवाला
साथ तुझ्याच हाकेची !
             
bhavna.9.April.2019

Thursday, March 28, 2019

स्वप्न

लहाणपणी ॲक्ट्रेस बनायचं स्वप्न पहावं ..कधी नृत्यांगना ..घरचे सांगतात म्हणून  डॉक्टर कधी ...कधी टेलर ....टिचर .. नंतर मोठे होऊन मिलीटरीमध्ये जाण्याचं ..आणि शेवटी चित्रशिल्पकार व्हावं ..

मनात येइल ते भरपूर शिकावं ...आयुष्यभर शिकत रहावं ..
हो थोडा पैसाही कमवावा ...
पुन्हा शिकावं ...
आता आपण मोठे झालो नै ..
आता छोटी स्वप्न पहावीत ..
पुर्वीच्या मोठ्या  स्वप्नातील काही आपोआप आपला पिछा करतात ..कधीतरी आपल्याला एखादं स्वप्न गाठतंही ...

खूप छोटीछोटी स्वप्नही पहावीत ....
साधारण अठवड्याला एक म्हट्लं तरी महिन्याला चारपाच ..वर्षाला पन्नासएक ...

बरीचशी स्वप्न विसरली जातात ..पुनः रीपोस्ट होतात ...
आणि ढीगांनी रिजेक्ट होत राहतात ...

रिजेक्ट होतात ढिगांनी...
पण दहा पैकी एखादं छोटसच पुर्ण होतं ...
आणि ते तेवढच आपलं असतं ..
आपलं स्वतःचं ...
 रिजेक्ट झालेली आपला पाठलाग करून कालांतराने आपल्याला गाठू पाहणारीही बरीच स्वप्न ..त्यातील काही पुढे थकून आपला पाठलाग सोडतातही ...

पण स्वप्मय ..हा आपला स्वभावगूण ...पुनः नकळत त्या मागे पडलेल्या  स्वप्नांना सोबत घ्यावं ...

तो ..वर्षभर  अर्धवट रंगलेला मोठ्ठा कॕनव्हास पुर्ण करायला घ्यावा म्हणजे नवीन स्वप्नांना आपोआपच  जागा होते ...

आणि एक दिवस ती छोटी विसरलेली स्वप्न नकळत आपल्यालाच शोधत येतात ... कोणाचंतरी एक  मोठं स्वप्न पुर्ण करण्यासाठी !
आणि त्यात आपणही सामावलेलो असतो !!
           ..... Bhavna.2019.March29.

Wednesday, February 6, 2019

' The boy from the weaver's land '

'the boy from the weavers land '

he was born in the land of ..weavers.
those of his uncles and grandfathers created drapes ...
drapes for the poor ..drapes for the rich ..
drapes with the cotton  .,drapes with the silk ..
Drapes with the gold and silver ...with the peacock and parrots ..
with the elephants and yhe horses in procession ...
the jungles weaved together with the love and patience with years of handwork ...
he is the patience ..he is the  love ..the boy ...

Yes is is not a weaver indeed ...he had it in his genes ...
his ancestors saw the kings marraiges ...the Maratha ceremonies filled wth silks ..emeralds ..rubies and the gold.
the ladies in the courts draped themselves in those silvers and the silk while the wardrobes of the princess filled with the  finest of drapes in golds and alas the  newly married groom in her greens and reds ...pinks ad indigoes .. the queen to be.
he is from the land of those weavers ...

he is indeed strong .. still soft spoken ..
he knows to connect to the people around ..still feels isolated ...
he wants to go walking the paths which connect contries ..he is a painter who has a girl of his dreams ...
his mind filled with the clear skies ...with no boundaries around.
he who knows to gather threads and weave his dreams with colours ...
he who draws her in his lines softhearted ...
he is not a weaver himself .. yet he has a heart of a weaver.
 ......bhavnasonawane