Monday, March 5, 2018

वृद्धाश्रम ...

माझ्या एका सिनीयर मित्राच गावी  वृद्धाश्रम आहे.
मी म्हट्लं त्यांना ...
म्हातारपण आल की मी येते रहायला.
माझ्या वयाच्या मित्रमैत्रिणींमधे ...
एक गँगच जणु..

बस समोर एक झाड हवं पारिजातकाचं ... शुभ्रकेशरी नाजुकतेनं बहरलेलं ..हसवणारं.
शेजारीच सावली देणारं दाट मुळ असलेलं एखादं झाड हवं ... थकलेल्या मनाला सामावून घेणारं
काही वेलीही ... एकमेकांना निस्वार्थ गुंफत जगणारं.

तो आनंदात म्हणाला की  ...हो ये की...
ती एक खोली तुझी वाट पाहील खरी.
मी म्हट्लं ... पण शेवटपरियंत मला काम करायचय ..
रंगात खेळायचय ...

हो तुला एक इझेलही देतो ...
रंगवत बस काय रंगवायच ते.

मग मी बाहेर एक बोर्ड लावेन ...
"आमच्याकडे एक सुंदर म्हातारी आहे जी चित्र काढते "
मग माझ्या वृद्धाश्रमासाठी लोक उत्सुक होतील.
गर्दीच गर्दी.

आणि खरंच ..त्याने ते वृद्धाश्रम माझ्यासारख्या वेड्यांसाठी नैसर्गिक रित्या सजवायला घेतलय...असं ऐकलय !
               ......bhavna.2018.