Monday, February 24, 2020

2020 .jan to march

गेल्या दोन महिन्यात कलाकार म्हणुन जवळजवळ  सात महत्वाचे अनुभव घेतले. सर्वच अनुभव वेगवेगळे ...

2020 वर्ष सुरू झाला अन् चाळीसगाव येथे केकू मूस यांची आर्ट गॕलरी व म्युझीयम येथे आम्हाला  भेट द्यायचा योग आला. एखाद्या कलाकाराचे आयुष्य कसे असते व तो जगापेक्षा खरच किती वेगळा असतो त्याचे सुंदर उदहारण मिळाले. मग खरंच आम्हा कलाकारांना जगापासून आणि संसारापासून पळून जावेसे वाटणे काही वावगे नाही. त्यातुनच चांगली कला निर्मिती घडत असते.

६०वे महाराष्ट्र स्टेट आर्ट प्रदर्शनामधील सहभाग हा माझ्यासाठी  खूप आनंदाचा विषय आहे. तेथे ह्या वर्षी मेटल बाऊलवर केलेले इनॕमल(काच फायरींग प्रोसेस) काम प्रदर्शीत झालेे.

श्रीनिवास नार्वेकरांनी  मंत्रालयात आयोजन केलेले 'ती' च्या कवितांवरचे चित्र प्रात्यक्षीक .. तो ही विलक्षण अनुभव होता. तेथे स्त्रीयांवरतच्या कविता वाचल्या जात होत्या आणि मला त्या ऐकत चित्रस्वरूपात उतरवायच्या होत्या.

 बदलापूर आर्ट गॕलरी मध्ये ऊपाध्यक्ष म्हणून माझी जी भुमीका आहे तेथे शाळेचे चित्रकला स्पर्धा व राज्यस्थरीय पोर्ट्रेट व लॕन्डस्केप कॉम्पिटीशन आमच्या टीम सोबत  रेजिस्ट्रेशन पासून बक्षिस वितरण समारंभापरियंत चे काम हा महत्वाचा टप्पा आहे. कलाकारांना एक चांगला प्लॕटफॉर्म मिळावा व मी राहत असलेल्या शहरातील सर्वांनाच समकालीन कला समजावी असे मला नेहमी वाटत असे. आज जे काही BAGच्या निमीत्ताने काम करते आहे ते माझे ंधरा वर्षांपासूनचे बाळगलेले स्वप्न आहे. ते कुठेतरी ठरले असते आणि मी फक्त एक दुआ आहे. आम्ही टीम म्हणून तेथे कलाकार आणि समकालीन कला प्रसार करण्यात आम्हाला आनंद असतो.

काला घोडा येथील अडीच महिने काम करून तयार केलेले इनस्टॉलेशन साठी तर क्युरेटर कडून फोन वर अपमानीत झाले  पण लोकांनी मला भरभरून प्रेम दिले..
माझा विषयच सुंदर होता.
 ' अॉरनामेंट्स फॉर दी ट्री ' मोडीलिपीत संत तुकारामांचा अभंग वृक्षवल्ली निवडला धागा/दुआ असा मुळ विषयावर काम करायचे असून मोडीलिपी झाड आणि संतवाणि हे एकमेकांशी संबंध जोडून मी कलाकृती केली होती. ते दोन प्रकारात संपुष्ठात आणले. एक मेटल आणि दुसरा स्टफ कॕनव्हास. मोडीलीपी आणि  संतवाणी मराठी माणसाचा जिवहाळ्याचा विषय म्हणून ओळखी ..अनोळखी लोकांनीही फोटो काढून ..फोन करून माझ्यासोबत चर्चाही केली. हे काम मला 25 फूट ऊंचावर झाडावर लावायचे होते आणि काळाघोडा टीम कडून मला फक्त दिवसाच्या उजेडाची आपेक्षा होती .. वाद झाले , काही गैरसमज केले गेले.  पण आखेरीस उजेडात ते काम बांधता ..सोडवता आले हे ऊत्तमखूप मनस्ताप झाला. कारण टीम ज्या पद्धतीने आपल्याशी चर्चा/चॕट करते ते अपमानास्पद वाटले.
विषय मोठा आहे पण वैयक्तीक रित्या कोणाला दुखवायचे नाही कारण वरून जसे निरोप येतात, टीम तशी ते निरोप पोहोचवतात. पण गैरसमज करण आणि गैरसमज पसरवण किती वाइट आहे नै ...असो ....मी ह्यापुढे कालाघोडा आर्ट फेस्टिवलला इनस्टॉलेशन प्रदर्शीत कराणार नाही हे फायनल.

त्यादर्म्यान गायत्री भटचा नृत्यनाद वार्षीक कथ्थक नृत्य सादरीकरण. या वर्षी मी प्रवेशिका पुर्णची विद्यार्थिनी आहे.  खरंतर मी ह्या वर्षी भाग घेणार नव्हते. कारण एवढं सगळं सुरू असताना  माझा मेंदू किती गोंधळलेला असेल ह्याची कल्पना होती. पण मला सादरीकरणाचा 'तराणा ' बोल आवडले आणि तबलापेटीची साथ असणार होती म्हणून नाही म्हणूच शकले नाही. आयुष्यात कथ्थक सादरीकरणाची खरी सुरूवात झाल्यासारखे आहे हे.

हे सर्व धावपळीचं सुरू असताना देह आर्ट कॕम्प सफाळेची जाहीरात बघून मी कानाडोळा केला होता. धावपळ दगदगीने खूप आळस होता. पण आशुतोष सरांच्या कॕम्पला नाही म्हणून चालणारच नव्हते.  येथेही चित्रकार म्हणूनच नव्हे तर येथे जगण्याचाही अनुभव खूप सुंदर होता कारण जवळपास रिक्षा नव्हत्या. सहाजिकच आयोजकांच्या गाड्या होत्या पण तीन दिवस जेथे जायचे तेथे पायाने चालतच. रहाण्याची सोय होती तेथे कधी कुलपांची गरज भासली नाही. मोकळी हवा ..मोकळा श्वास. आणि घरचे जेवण ... तेथे एक दिवस 'तुझी आम्री' नाटक पाहण्याचा योग आला व आपट्यांची पानेचे अभिवाचनही ठेवले होते.
मी चित्र निमीत्ताने बाहेर जाते तेव्हा सहसा माझ्या मुलांना सोबत नेणं अवघड होत असते. पण सफाळे येथे माझी लेक स्कारलेटला सुट्टी म्हणून सोबत न्यायचे ठरवले. तेथे   तिला इतरही मित्रमैत्रिणी लाभले... अगदी आभाळाच्या खाली ते मोकळे आंगण झाले होते. मग आमच्यातही अधून मधून मिसळत होते.
सोबत हिडींबा (कुत्री) आमच्यात असायची.
 देह दान, अवयव दान सारख्या जड विषयांचा विचार आणि काम करण्याचा अनुभव. व हे एक अगदी मोठे घर असल्यासारखे वाटत होते.

विषयही असा की काम करण्यात आनंद होताच पण तेथे सेल्फीचा नाद नव्हता.

 हे जे विवीध दोन महिने कलेसाठी गेले त्यात पैसे स्वरूपात मिळकतिची अपेक्षा नाही .... काही चांगल करण्याकरिता आमच गुंतणं आणि काही सुंदर घडविणं. तरी हे विवीध प्रयोग अगदी धम्माल व समाधानकारक झाले.

आणि माझ्या आजूबाजूला वावरत असलेले खोटे चेहरेही साफ उघडकीस आले.

आज कलाजगताचे बदलते चित्र, निटनेटकेपणा, मॉल सिस्टीम, शहरातील कलाकारांमधील पाश्चात्य स्टाईलने सरकत आलेला सोफेस्टिकेटेडनेसचा दिखावा. कपड्यांमधील निघून जाणारी पारंपारिकता , दिखावा म्हणून मॉडर्निजम ... हे खूप वाइट आहे.

ह्या कार्या दर्म्यान खूप छान भेटी ओळखी होत असतात आणि साधेपणाने कार्यरत असलेले दिग्गच भेटत आहेत ..कौतूकही करत आहेत हे खरच खूप समाधान आणि आनंददायी आहे.
आणि ही अशी माणसं नैसर्गाला सोबत घेऊन व साध्या सरळ मनाने निखळ हसूने व कमी गरजांनी जगायला प्रेरीत करतात हे भाग्य.
             ...... BhavnaSonawane. 1st March 2020. 

951123106

Saturday, February 15, 2020

Ornaments for the Tree ..article by Rahul Thorat

।। लघुलेख ।।
राहुल धोंडीराम थोरात

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2823835007675569&id=100001472932746

'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' आणि चिपको आंदोलन

काळाघोडा फेस्टिव्हल हे मुंबईतील एक आगळेवेगळे फेस्टिव्हल दरवर्षी एक कलात्मक रंगीन मेजवानी घेऊन येतो। या वर्षीच्या काळाघोडा फेस्टिव्हल मध्ये 'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' हे एक विशेष प्रायोगिक इंस्टोलेशन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। प्रतिभावंत आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रकार भावना सोनवणे यांनी 'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' या प्रायोगिक  इंस्टोलेशनची निर्मिती केली आहे। काळाघोडा फेस्टिव्हलच्या यंदाच्या 'थ्रेड- धागा' या थीमला जोडणारी अनोखी प्रयोगशील संकल्पना आहे। निसर्ग आणि मानव यांना संत तुकाराम यांच्या अभंगाने जोडण्याचा, कनेक्ट करण्याचा भावना सोनवणे यांचा प्रयत्न यशस्वी दिसतो। सिम्प्लिसिटी, सौंदर्यपूर्ण भाव आणि परिणामकारक सकरात्मक विचार मांडणी हे या इंस्टोलेशन चे वैशिष्ट्य आहे।

'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री'  इंस्टोलेशन मुळे 1970 साली भारतात झालेल्या 'चिपको' या झाडांच्या बचावासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाची आठवण येते। तसेच राजस्थानातील बिष्णोई समाजातील वृक्ष संवर्धनासाठी लढणाऱ्या प्रसंगी जीवाची बाजी लावणाऱ्या स्त्रीयांच्या आंदोलनाची आठवण होते।या आंदोलनाची आतंरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली होती। म्हणूनच 'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' हे इंस्टोलेशन महत्वाचे ठरते। आपल्याकडे सामाजिक बदल हे चळवळीतून होतात। त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी देशपातळीवर चळवळ आवश्यक आहे। आणि अशा कलाकृती चळवळीला पोषक ठरतात। निसर्ग आणि मानव यांची मैत्री ही अनादी काळापासून आहे। पृथ्वीवर मानवी जीवन सुरू झाले तेव्हा पासून ही मैत्री बहरत आली आहे। डार्विनच्या सिद्धांतानुसार मानवी मेंदू हा उत्क्रांतीच्या प्रकियेत डेव्हलप होत गेला तसा निसर्ग आणि मानव यातील मैत्रीभाव यात अंतर पडू लागले। आणि आता तर तंत्रज्ञानाच्या युगात निसर्ग आणि मानव यातील मैत्रीचे नाते जवळपास संपले आहे। प्रगतीच्या नावाखाली निसर्गाला संपविण्याचे कसब मानवाने मिळविले आहे। आणि निसर्गाची अपरिमित हानी रोज होत आहे। परंतु यामुळे मानवी अस्तित्व च धोक्यात आले आहे म्हणून पुन्हा एकदा मानव निसर्गाकडे एक मित्र म्हणून बघू लागला आहे। आता त्याला निसर्गाची गरज भासू लागली आहे।

भारतीय संत साहित्यात निसर्गाला अध्यात्माशी जोडून मानवी जीवनाचा मूळ उद्देश अतिशय समर्पक आणि सुलभ अशा भाषेत 'अभंग' स्वरूपात मांडणी करून माणसाला निसर्गप्रति संतांनी अधिक संवेदनशील बनविले आहे। संत तुकाराम महाराजांनी या संबंधी बहुमोल कार्य केले आहे। आणि आजही आपण संत तुकाराम यांचे अभंग आपल्या आचरणात आणि जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करतो। चित्रकार कवी, लेखक, विचारवंत, अभ्यासक यांना संत तुकाराम यांचे अभंग आकर्षित करतात।

'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' या इंस्टोलेशन निर्मिती संदर्भात चित्रकार भावना सोनवणे यांच्याशी मुलाखत घेतांना त्या म्हणाल्या, इंस्टोलेशन हा कला प्रकार विचारप्रसारणासाठी प्रभावी माध्यम आहे। परंतु कलाकाराने या माध्यमात काम करतांना सजग असणे आवश्यक आहे। कल्पना स्वातंत्र्य आहे म्हणून स्वैराचार करू नये। आपल्या विषयाशी संबंधित आकार, रंगसंगती आणि प्रॉप्स वापरले पाहिजे। तसेच कलाकाराकडे निर्मितीचे कसब ही असायला हवे। तरच तुमची कलाकृती ही दर्जेदार होते। प्रेक्षकांवर छाप सोडते। विचार करायला भाग पडते। 'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' या इंस्टोलेशन निर्मिती मध्ये कापड, पत्रा, अलूमिनिअम पत्रा, दोरा, तार या साहित्याचा वापर करण्यात आला आहे। दहा बाय बारा फूट आकाराचे हे काम आहे। हे इंस्टोलेशन जमिनीवर नसून झाडावर हँग करण्यात आले आहे। आणि तेही झाडाला कुठलाही त्रास न देता, झाड कुठेही न कापता अत्यंत संवेदनशील पणे हे इंस्टोलेशन उभारले गेले आहे। संत तुकाराम महाराज यांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' हा अभंग मोडीलिपी मध्ये सादर केला आहे। ह्या अभंगातील शब्द जणू झाडांसाठी चे दागिने आहेत अशी कल्पना आहे। 'ऑरनामेंट्स फॉर दी ट्री' या इंस्टोलेशन ची दखल 'व्होग' या आंतरराष्ट्रीय मासिकाने घेतली आहे। विविध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतली आहे।

चित्रकार भावना सोनवणे यांनी पॅरिस मध्ये एका आर्ट रेसिडेन्सीत स्कॉलरशिप मिळवून चार महिने कलानिर्मिती केली आहे। या काळात पॅरिस मधील विविध आर्ट म्युझिअम त्यांनी अगदी जवळून पाहिली आहेत आणि अभ्यासली आहेत। यात लूर म्युझिअम, इकोल दे बोझा आणि पोमपीडिव्ह म्युझिअम या जागतिक कीर्तीच्या म्युझिअम चा समावेश आहे। भावना यांचा जन्म हा सोलापूरचा आणि बालपण हे मुंबईत गेलं आहे। आईवडील पेशाने प्रोफेसर आहेत। वडिलांची इच्छा होती की भावना यांनी डॉक्टर व्हावे। परंतू भावना यांची मूळ आवड ही चित्रकलेची होती। चित्रकलेचे शिक्षण त्यांनी रहेजा स्कुल ऑफ आर्ट आणि सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मधून पूर्ण केले आहे। चित्रनिर्मिती करीत असतानाच सोबत बदलापूर आर्ट गॅलरीचे कामकाज पहातात। विवीध राष्ट्रीय आर्ट रेसिडेन्सी मधून सक्रीय सहभाग घेत असतात।

भावना या एक प्रयोगशील कलावंत आहेत। सिरॅमिक, ब्राँझ, कॉपर आणि ज्वेलरी डिझाईन आदी कलेचे विविध प्रकार समर्थपणे हाताळतात। भावना यांचे एकूण व्यक्तिमत्त्व हे सकारात्मक आहे। याची छाप त्यांच्या कलाकृतीतून पाहायला मिळते। भावना सोनवणे यांच्या कलाकृतीत आपल्याला निसर्गाची विविध रूपे दिसतात। निसर्गाला आपल्या विविध माध्यमातील कलाकृतीतून आपल्या समोर मांडून आपल्याला निसर्गाप्रती अधिक संवेदनशील बनवतात। निसर्गाप्रती आपले सर्वांची काय जबाबदारी आहे याची जाणीव करून देतात।