Tuesday, May 30, 2017

वेंधळा तू...

नेहमीच वाट पहायला लावणारा तू ...
फसवणार म्हणालास नी वेळेवर आलास खरा
वेंधळा पाऊस तू...
केलेला वादा तूच विसरला खरा!

वेड्यांनी असं शहाण्यागत वागायचं नसतं...
मी आलोच सांगून... हळूच निसटून जायचं असतं!

त्याशिवाय तुझी आठवण काढेल का कोण...
त्या शिवाय तुझी वाट पाहील का कोण...
तू पाऊस वेंधळा खरा...!!
                            bhavna.

Sunday, January 1, 2017

तुझं घर ते ..


 दूरवर त्या गिरीशिखरी
लपलेले तुझं घर ते..
शोध शोध शोधलं
परि मन मागे वळलं.

भिरभिरणाऱ्या मम नजरेला
धडपडणाऱ्या पावलांना
ते घर... तू ही
सापडला असतास खरा
तर शोध थांबला असता तिथेच.

मोहक ते लांब लांब तुझे असणं
न दिसूनही मज तू दिसणं
बघ, आता राहील... निरंतर...
                            - bhavna