हा बघ ... हा वाला आता मी उशीखाली ठेवणार.
मग मला फेरी गिफ्ट देणार !!
मी : नको .. फेरी ला सांग पैसे दे.
ती: नाही फेरी गिफ्ट देते आणि पैसे पण देते
मी : काही नाही .. पहिल्या दाताला गिफ्ट देते असेल.
आता पुढच्या दातांची किंमत कमी होते नै ...
ती: पैसे चालतील की
ओके .. जे देइल ते देऊ दे.
(रात्री झोपताना उशीखाली ठेवलेला दात सकाळी तसाच होता)
ती : ए आई ... फेरी मला विसरली
मी: थांब जरा .... तिला कामात लक्षात राहिले नसेल.
उशीरा येणार असेल.
(दुपारी पंनास पन्नास च्या दोन नोटा उशीखाली सापडतात)
ती: आय ..आई बघ .. फिफ्टी प्लस फिफ्टी ... हंड्रेड
मी: अरे व्वा ...
ती: पण गडबड आहे.
हे पैसे तुझे तर नाहीत? फेरी असे पैसे देत नाही.
दात पण घेऊन जाते.
मी: मला ते नाही माहीत ... आमच्या वेळेत फेरी तुटलेला दात कधीच विकत घ्यायची नाही ...
ती: अगं पण दात तसाच ठेवला तिने.
मी: बरं ... ती विसरली असेल. नेइल.
ती: नाही विसरत नाही. मी मातीत टाकते आता तो दात.
मी: मग बर्याच पोरांचे दात जमा करून वजनाने दमली असेल. नाजूक असते नै ती... उद्या नेईल. तू नको टाकू ... पैसे गायब झाले तर...
ती: ओके .. पण तरी गडबड आहे. ही कामे ती रात्री करते.
मी: अगं ... आपण कसे पैसे देउन तसेच घरी येतो अन् विसरलेली भाजीची पिशवी सकाळी आणतो .. तसं झालं असेल बघ.
येईल येईल परत ...
ती : बरं ..वाट बघते.
मी: माझ्या रूट कॅनलची कॅप निघालीय ...ती सिरॅमिक कॅप घेईल का?
ती: दे ... तिला खरा दात वाटेल.
मी: किती पैसे देइल?
ती: मला हंड्रेड दिलेत ... तुझा दात मोठा आहे .. टू हंड्रेड देईल.
मी: नक्की?
ती: म्हण्जे काय .... देइल ती.
(सकाळी )
ती: आई आई .. बघ माझा उशीखालचा तो दात गायब झाला ...
फेरी घेऊन गेली दात.
मी: मला सांग .. इतके दात जमा करून फेरी त्याचे करते काय ??
ती : दाताना जोडून तिचे घर बनवते.
मी : 🤔🤔🤔