Friday, January 31, 2020

असंच

रात्रंदिवस काम करून कलाकृती  स्टुडीओतून बाहेर पडली की ती जागा छान रिकामी वाटू लागते.
ती परत येणार की बाहेरच्या बाहेर निघून जाईल हा विचार कधीच नसतो.
 जगाच्या पाठीवर कुठेही मिरवली तरी ती आपल्याच नावची कायमची दर्ज असते.

कलाकृती पुर्ण झाल्याचा आनंद असतो
....स्टुडीओ प्रमाणे मनही हल्क होऊ लागत.

पुर्वी आठवडाभर बीपी लो झाल्यासारख वाटत असे.
मग महीनाभर माझ्याकडे बघ ...लक्ष दे ... मला काही हवंनको ते पहा ...अस सांगणारी ती कलाकृती समोर नाही म्हणून महीना जातो मन सावरायला.

मग तिची कमी भरून काढायला नवीन काही घडवणं आलंच.
 this Art is an Addiction ...
                  .........bhavna.feb.1.2020.

#KalaghodaArtFestival
#मोडीलिपी
#kalaghoda
#bhavnasonawane
#kgafest #MyKGAF #KGAF2020

Sunday, January 19, 2020

Girls from kashmir valley

2012 ची काशमीर येथील  आठवणी....
मी, अनिश







व आमचा 9 वर्षांचा लेक अथर्व ..आम्ही बाइकवर मुंबईहून लेह..लदाख व परत मुंबई असा रसता आखला होता.

 संपुर्ण प्रवास नॕशनल हायवेने करायचा. संध्याकाळ झाली की आहोत त्या ठिकाणी हॉटेल पाहून थांबायचे. आमच्यासोबत आणखी चार बाईक होत्या ..दहाबारा मित्रमैत्रिणींचा ग्रूप.

लेहला पोहोचायच्या आदिचे दोन दिवस .. जवाहर टनेल क्रॉस केले ..तेव्हाचा अनुभव छान होता. मुंबईहून आलेले बाईक ..व एक लहान मुलगा त्यात अथर्वला  पाहून तेथील काश्मिरी पोलीसही कौतूक करत होते.

त्या संध्याकाळी वेरीनागला भर पावसात हॉटेल मिळेनासे झाले आणि एका म्हातार्या हॉटेल मालकाने जितक्या खोल्या रिकाम्या होत्या त्या व हॉलमधील टेबल खुर्च्याही काढून रिकामा करून एक रात्र रहायला जागा केली होती.

दुसर्या दिवशी अनंतनागला महाराष्ट्राच्या नंबरप्लेट पाहून तेथील पाटील नावाच्या पी एस आयने बाईक थांबवून आम्हाला त्यांच्या छावणीत जेवायला आमंत्रण दिले तेव्हा आम्हाला  पहायला गाव काश्मिरी गाव जमा झालेला.
तेथील पोरींचे काय कौतूक करू .. खूप सुंदर ... आपण मुंबईकर आहोत हे कळल्यावर घरी जेवायला बोलवायचे. सोबत फोटोही काढून घ्यायचे.

कारगील आधी द्रास लागले अन् विश्रांती साठी अर्धा तास थांबलो. द्रास खूप सुंदर आहे. कारगी जितकं रखरखीत ..द्रास तितकच हिरवगार ..खूप थंडी आणि संपुर्ण डोंगर बारीक पिवळ्या फुलांनी भरलेले दिसत होते ..अगदी कपूर फॕमिलीच्या 80's च्या एखाद्या फिल्मी गाण्याप्रमाणे.
मी हे सर्व सौंदर्य न्याहळत होते आणि जवळच  अथर्व उड्या मारता मारता चिखलात पडला. सोबत मोजकेच कपडे असायचे . बाईकवर तीघे होतोच आणि सोबत बाईकचे टूल .. टायर ट्यूबऔषधं ..थोडेसे कपडे.
  त्याचे अंगावरचे दोन्ही जाकेट खराब झाले ..कसेतरी पुसून घेतले. आतून थर्मोकोट असायचा. पण त्याला पॕन्ट बदलणे गरजेचे होते आणि चिखलाची पॕन्ट धूणे गरजेचे होते. दोन शाळकरी मुली घरातून हसत बाहेर आल्या.  अगदी कॕलेंडरसारखा तो डोंगराळ हिरवगार गवतात वसलेले एकदोन घरांचा सीन होता.
मी वाहत्या ओढ्यात हात टाकायचा प्रयत्न केला पण बर्फाळलेले पाणी..हिंमत कुठच्या कुठे पळली. त्या दोघींनी सहज हातातून कपडे घेऊन धून दिले...

द्रास नंतर कारगीलचे डोंगर पार करायचे होते. सकाळी खाललेल्या मॕगी नंतर दुपार सरू लागली तरी जेवण्यासाठी हॉटेलही दिसले नवौहते. थेट कारगीललाच नशीबात असेलतर जेऊ असे ठरवले होते.

त्या मुलींनी  खूप आग्रहाने जेवायला थांबवायचा प्रयत्न केला  पण संध्याकाळच्या आत कारगील गाठायचे असल्यामुळे आम्हाला थांबणे शक्य नव्हते.
मुंबई म्हट्लं की त्या काश्मिरी मुलींचे डोळे अगदी चमकून स्वप्नमय होत असल्यागत वाटायचं ...
आज काश्मीरमध्ये जे वीश पेरले जातेय ते खूप त्रासदायक आहे. 

Sunday, January 5, 2020

शाळा

आज वर्ष 2016ची एक आठवण झाली. तसे आपण कोणासाठी काही चांगले करतो ते कोणाला सांगायचे नसते म्हणतात. तरिही बरेच वर्ष मनात ठेवून आज सांगायला हवे असे वाटते....

माझी तिसरी ते दहावी वर्ग पुर्ण केलेली शाळा. किती प्रेम असते नै आपलं ..आपल्या शाळेवर?
मी सतत माझ्याच स्वपनांत रमणारी ... शिक्षक वर्ग संपवून बाहेर गेले की लगेच तुटके ..कधी संपुर्ण खडू घेउन त्यावर बाहूली ..शब्द वगैरे कोरत बसायची. वर्गातील काही मुलंमुलीना देखील माझ्यामुळे त्या खडूंमध्ये रमायची सवय झाली होती. तशी मी ढ ही नव्हते ..अधूनमधून थोडा अभ्यासही करत असे.

काही वर्षांनी मी देशात तसेच विदेशातही चित्रकार म्हणून नावाजली जात आहे हे कळताच माझ्या रिटायर्ड वर्ग शिक्षिकांना देखील माझे खूप कौतूक वाटू लागले होते.

तीच माझी शाळा ..
तेथे मी आणि माझ्या ओळखीचे नावाजलेले व्यक्ती मिळून शाळेतील मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटीशन निमीत्त  विनर्सना आर्टीस्ट क्वालिटी कलरचे विवीध सेट एकत्रीत गिफ्ट पॅक करून पाठवले होते.

आपल्याकडे दगडासारखे रंग असायचे पण ह्या मुलांना छान रंग मिळायला हवेत म्हणून आर्टिस्ट वॉटर कलर, अॉइल पेस्टल, पेन्सिल कलर, क्ले, ब्रश, पोस्टर कलर , स्केचपेन ..सगळीच धमाल होती की त्यात.

आम्हाला कॉम्पिटीशन वेळेस जाता येणार नव्हते तरी ठरल्याप्रमाणे आम्ही ठरलेल्या दिवशी शाळेत जाऊन रंगाचे सर्व सामान देऊन आलो.
त्यासाठी आम्हाला प्रिंसीपलना भेटायची इच्छा होती पण ते रजेवर होते पण तेथील ज्युनियर कॉलेजचे प्रिंसीपल भेटल्या.
सोबत शाळेचे ड्रॉइंग टीचरही होते.

शाळेला भेट म्हणून स्टाफरूम मध्ये ठेवायला माझे एक चित्रही नेले. चित्र माझ्या त्या शाळेचे कॉम्पोझिशन होते. व मधोमध चिंचेचे झाडही.

ड्रॉइंग टीचरना सुचवले की एक शाळेचे लेटर हवे आहे ..
मुलांना दिलेली बक्षिस मिळाल्याबाबत व एक माझे चित्रही शाळेसाठी मिळाल्याबाबत.
प्रूफ म्हणून असायला हवे म्हणून.

आणि पुढेही दर वर्षी चित्रांसाठी बक्षिसे आणि दर वर्षी वाढीव काही करता आले तर करायचेच होते कारण त्या मुलांमधूनच आणखी कलाकार घडणार असतात.

 प्रिंसीपलचा काहीही निरोप आला नाही. त्यानंतर मी दोनतीन वेळा चौकशी केली तेव्हा ड्रॉइंग टीचरकडून कळले की अशा आर्ट स्पर्धां दर वर्षी घेण्याची इच्छा त्यांच्या प्रिंसीपलच्या मनात नसावे.

 मी सहसा माझी चित्र एक आठवण म्हणून कोणाला देत नसते. मला आजही माहीत नाही की माझे ते चित्र कोठे आहे.

तीन वर्षे उल्टून गेली.
आज पुन्हा त्या शिक्षकांना विचारले असता ते म्हणाले त्यांना काही आठवत नाही व त्यांना ह्याविषयी काही माहीत नाही.

मी चांगल्या विचाराने काही सुरू केले पण ते कटीन्यू करता आले नाही ...वाइट वाटते.
हो ...बहुतेक ती माझी चूक होती.
आता मला माझे चित्र अशा शाळेत ठेवायची इच्छा नाही...
चित्र परत हवे आहे. भले ते छोटे आहे.
 ..........Bhavna.dec.
2020.