Sunday, January 5, 2020

शाळा

आज वर्ष 2016ची एक आठवण झाली. तसे आपण कोणासाठी काही चांगले करतो ते कोणाला सांगायचे नसते म्हणतात. तरिही बरेच वर्ष मनात ठेवून आज सांगायला हवे असे वाटते....

माझी तिसरी ते दहावी वर्ग पुर्ण केलेली शाळा. किती प्रेम असते नै आपलं ..आपल्या शाळेवर?
मी सतत माझ्याच स्वपनांत रमणारी ... शिक्षक वर्ग संपवून बाहेर गेले की लगेच तुटके ..कधी संपुर्ण खडू घेउन त्यावर बाहूली ..शब्द वगैरे कोरत बसायची. वर्गातील काही मुलंमुलीना देखील माझ्यामुळे त्या खडूंमध्ये रमायची सवय झाली होती. तशी मी ढ ही नव्हते ..अधूनमधून थोडा अभ्यासही करत असे.

काही वर्षांनी मी देशात तसेच विदेशातही चित्रकार म्हणून नावाजली जात आहे हे कळताच माझ्या रिटायर्ड वर्ग शिक्षिकांना देखील माझे खूप कौतूक वाटू लागले होते.

तीच माझी शाळा ..
तेथे मी आणि माझ्या ओळखीचे नावाजलेले व्यक्ती मिळून शाळेतील मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटीशन निमीत्त  विनर्सना आर्टीस्ट क्वालिटी कलरचे विवीध सेट एकत्रीत गिफ्ट पॅक करून पाठवले होते.

आपल्याकडे दगडासारखे रंग असायचे पण ह्या मुलांना छान रंग मिळायला हवेत म्हणून आर्टिस्ट वॉटर कलर, अॉइल पेस्टल, पेन्सिल कलर, क्ले, ब्रश, पोस्टर कलर , स्केचपेन ..सगळीच धमाल होती की त्यात.

आम्हाला कॉम्पिटीशन वेळेस जाता येणार नव्हते तरी ठरल्याप्रमाणे आम्ही ठरलेल्या दिवशी शाळेत जाऊन रंगाचे सर्व सामान देऊन आलो.
त्यासाठी आम्हाला प्रिंसीपलना भेटायची इच्छा होती पण ते रजेवर होते पण तेथील ज्युनियर कॉलेजचे प्रिंसीपल भेटल्या.
सोबत शाळेचे ड्रॉइंग टीचरही होते.

शाळेला भेट म्हणून स्टाफरूम मध्ये ठेवायला माझे एक चित्रही नेले. चित्र माझ्या त्या शाळेचे कॉम्पोझिशन होते. व मधोमध चिंचेचे झाडही.

ड्रॉइंग टीचरना सुचवले की एक शाळेचे लेटर हवे आहे ..
मुलांना दिलेली बक्षिस मिळाल्याबाबत व एक माझे चित्रही शाळेसाठी मिळाल्याबाबत.
प्रूफ म्हणून असायला हवे म्हणून.

आणि पुढेही दर वर्षी चित्रांसाठी बक्षिसे आणि दर वर्षी वाढीव काही करता आले तर करायचेच होते कारण त्या मुलांमधूनच आणखी कलाकार घडणार असतात.

 प्रिंसीपलचा काहीही निरोप आला नाही. त्यानंतर मी दोनतीन वेळा चौकशी केली तेव्हा ड्रॉइंग टीचरकडून कळले की अशा आर्ट स्पर्धां दर वर्षी घेण्याची इच्छा त्यांच्या प्रिंसीपलच्या मनात नसावे.

 मी सहसा माझी चित्र एक आठवण म्हणून कोणाला देत नसते. मला आजही माहीत नाही की माझे ते चित्र कोठे आहे.

तीन वर्षे उल्टून गेली.
आज पुन्हा त्या शिक्षकांना विचारले असता ते म्हणाले त्यांना काही आठवत नाही व त्यांना ह्याविषयी काही माहीत नाही.

मी चांगल्या विचाराने काही सुरू केले पण ते कटीन्यू करता आले नाही ...वाइट वाटते.
हो ...बहुतेक ती माझी चूक होती.
आता मला माझे चित्र अशा शाळेत ठेवायची इच्छा नाही...
चित्र परत हवे आहे. भले ते छोटे आहे.
 ..........Bhavna.dec.
2020.

No comments:

Post a Comment