Wednesday, December 12, 2018

फ्रेम

अचानक एका प्रिय कुटूंबाला एक जलरंग चित्र गिफ्ट करायच ठरावं ...
मग गावात चौकाभोवती साधारण एक किलोमिटर गोलगोल फिरून कोपर्यात एक देवचित्रांचा फ्रेमर सापडावा ...
त्यातल्या त्यात कमीतकमी सोनेरी फ्रेम नक्की करावी...
बरं ..फ्रेमर आपला नेहमीचा नाहीय हे चक्क विसरून त्याने सांगितलेली किंमतीलाही होकारार्थी मान हलवावी आणि आपण तासभर भट्कून येइस्तोवर त्याने फ्रेमच्या पट्ट्या कापून ठेवाव्यात ..काच साफ करून ठेवावी.
आपण येताच ते इंपोर्टेड हॕन्डमेड कागदावरचं नाजूक चित्र त्या फायबर फ्रेम व काच मध्ये फीट करून चक्क खीळे ठोकायला सुरूवात करावी ...
आणि एक खीळा ठोकल्यावर आपल्याकडे पर्याय उरला नसल्याने मंदबुद्धी सारख त्याची फायबार पट्ट्यांवर खिळे ठोकमठोकी पाहत रहावी ...
नं त्याला हिंदी येतं ..ना मला तामीळ ...
नं त्याला हिंदी येतं ..ना मला तामिळ ...
फायबर समोर नीटनेटकं ...बाजूने दोनचार बाहेर आलेले खिळे त्याने सहज न्याहाळावेत ...
आपण अजूनही मंद प्रमाणे त्याचं काम पाहत रहावं ...
त्याने एक काळी एक इंची टेप काढावी आणि खिळे ..पट्टीचे क्रॕक लपवावे ...
समोरून फायबर ..बाजूने ..मागे काळी टेपची पायपींग ...
भल्तच सॕटीस्फाइड नजरेने त्याने ते फ्रेम्ड चित्र आपल्या हाती सुपूर्त करावं ...
नं त्याला हिंदी येतं ..ना मला तामीळ ...
                           ......bhavna.2018.dec

Tuesday, October 30, 2018

बेडुक पुनः एकदा...

बेडुक माणसासारखाच असतो ..
अगदी माणसासारखा !
पहाटेपहाटे मी दार उघडायला निघालेच होते की एक अडीच  इंची बेडुक खालच्या खोलीत "ती आली ..ती आली" करत बाहेरचा रसता शोधत जमिनीवर ठेवलेल्या  सामानाच्या आत शिरायच्या प्रयत्नात अंधारातच तडफडत होता.
ते भलं मोठं सागवानी रात्रीच घट्ट लावलेलं दार ... आत शिरायला कोठून जागा मिळते ह्यांना कय माहीत?
एक पेपर रोल हाती लागला आणि त्याला त्या दारातून बाहेर निघायचा रसता दाखवला .. डोक्याला रोल लागताच डोक्याने रोल संपुर्ण ताकतीने जोर लावून माझ्याकडेच ढकलत होता .. ऐकायलाच तयार नाही .
बरं मग थोडी ताकत लावली अन् त्याला ढकलतढकलतच पाच इंची ऊंबरठा चढायला लावला ..आणि तेथून वरूनच ढकल्ला....
मी मदतच तर करत होते त्याला ....
माणसाप्रमाणे त्यालाही दुसर्यावर सहज विश्वास नाही ...
 बाहेर पडताच उजेडामुळे झोपेतून जागा झाल्याप्रमाणे आजुबाजूला पाहत आनंदात उभ्याउभ्या दोन उड्याही मारल्या अन् ग्रीलच्या दिशेने निघाला ..
आता गाडी पुनः ग्रील मधे आडकलीच ...ते झाडाच्या कुंडीतलं एक वडाचं पान त्याने डोकावताना पाहिलं..नी हायसं वाटलं.
एकएक हालचाल त्याच्यामेंदूचे व चेहर्याचे निरागस हावभाव सांगते.....
आहे की नै माणसागत?
 ........Bhavna Sonawane. October2018

Saturday, October 13, 2018

काहीतरी पर्यावरणासाठी ...आपल्यासाठी.

गरब्याची प्लास्टीक चकाकी पाहिली की हरवायला होतं ....
त्यात आपला साधेपणा हरवल्यागत वाटतं ...
नव्वद टक्के साड्या ..पर्कर-पोलके सिंथेटीक
नेट व चकाकणार्या प्लास्टीकने पूर्ण होतात.
शर्ट झब्बेही सिंथेटीक ..सिल्क लूक देतात ..
बट डू दीज क्लोथ ब्रीद? पाहूनच घुसमट होते ..
जे फारतरफार  पाचसात वेळाच वापरण्याच्या लायकीच्या असतात.
पण इतरांमधे शोभून दिसणं ..याला कित्ती महत्व द्यावं लागतं .... किंबहूना आपणही त्यातलेच...

जोपरियंत लहान तोपरियंत मुली असे चकाकणारे कपडे घालतात....त्यांच्या चकाकणार्या आयांना पाहून त्याही चकाकतात....
एकदा टोचणारा बोचणारा कपडा ओळखायला लागला की त्याही तशा कपड्यांना नकार देतात...पण हल्ली अॉल इज फाइन म्हणत डिझाइनर लूक म्हणत हजारो  रूपये सिंथेटीक वर उडवले जातात ...
कॉटन व सिल्क चा प्रश्नच नाही पुनर्वापर शेवटी अगदी  गोधडीही होत असे ..
कुठे हरवतोय आपण
 ह्या कपड्यांवरच्या प्लासटीकचं पुढे काय होतं माहीत आहे का??
आपण हजारो ...लाखो रूपयांचे कपडे रूपात जमा करत  वर्षोवर्षे वॉर्डरोब मधे जपून ठेवतअसलेला कचराच तो..
कचर्याचं पुढे काय करतो आपण?

नेट व सिंथेटीक वगैरे कपडे धुताना मटेरियल विरते ... पाण्याद्वारे नाल्यात.. नद्यात समुद्रात विलीन होते.
चकाकणार्या टिकल्या मणी ..कुंदन ... पाण्याद्वारे नाल्यात.. नद्यात समुद्रात विलीन होते.
पण ते विरघळत नसल्यामुळे माश्यांच्या ..पक्षांच्या नाकातोंडात अडकते.
त्यांची धुसमट होते.... आणि मासे खाताना नकळत काही प्रमाणात आपल्या आहारातही आढळते.
मीठही खार्या पाण्याद्वारे उपलब्ध होते.

आता दिवाळीला जपून खरेदी करूयात.
आपण कपड्यांच्या रूपात किती किलो प्लास्टीक विकत घेतोय ह्याचं  भान ठेऊन खरेदी करूयात.
चकाकणं कमी केलं पाहिजे....पर्यावरणासाठी !!
 .....Bhavna October 2018.

Sunday, September 23, 2018

15 kg पुस्तकं

<3i ....="" p="" remember="">पॕरीस हून परतताना तेथे सर्वात वजनदार असे काय खरेदी केले असेल तर पुस्तकं .
मी राहत असलेल्या इमारती समोरच एक रद्दीवाला होता. त्याच्याकडे रोज हवर्यासारखी पुस्तकं चाळायची ... मायकलान्जीलो ..राफेल .... पॉल गॕगीन .. असे सेपरेट मास्टर्स कपाटात ठेवायला मिळणं त्यासारख दुसरं नशीबच नाही.
त्यात चुकून कधीतरी स्पॕनीश चित्रकार पॉल क्ली सापडेल ह्या आशेने सिएन नदी काठाहून चालत चालत समोर दिसेल ती रद्दी पालथी घालायची.
एक..ते चार युरो मध्ये मिळणारी पुस्तकं म्हणजे आगाळवेगळं सुख ! 
बरं ती इंग्रजी आहेत का फ्रेंच ते न पाहता विकतची जवळजवळ पधरा किलो जमलेली पुस्तकं आणि कागदं.. भारतात पाठवायला पोस्टात गेले तेव्हा तिथली माणसं हसत होती माझ्यावर ...
 time to revise memories

Tuesday, September 18, 2018

अमूर्त चित्र.. a thought

जसे नृत्य ...गायनाला शास्त्र आहे ..गीत व कवितेलाही .. तसेच चित्रकलेला ठराविक शास्त्र आहे.
चित्र त्या नियमांना धरूनच पुर्ण केलं जातं.
चित्रकाराला व चित्र पाहणार्याला त्या शास्त्राद्वारे जो आनंद मिळतो ..तेवढच त्या चित्राचे कार्य आहे....त्यात प्रयेकाला गूढ काहीतरी सापडावं असं काहीच नसतं.
पण तरी तो आनंद कितीही सोप्पा वाटला तितकाच अवघड... प्रत्येक चित्रकाराची त्याच्या आवडी व अभ्यास ..सरावाप्रमाणे एक विशिष्ठ शैली असते... आणि त्याच सहाय्याने तो ते ठराविक भाव सहज आपल्या चित्रात उतरवतो.

कोणतिही कला असो ...ते शास्त्र ..नियम प्रात्यक्षिक आणि वैचारिक दोन्ही असतात ..काही ठराविक वय गाठल्यानंतरच पदरी पडतात.
तोपर्यंत त्या कलाकाराने कटपुथली प्रमाणे स्वतःला आपले शिक्षिक सांगतिल त्याप्रमाणे अभ्यासात झोकून द्यायचे.
जसे बाथरूम सिंगर त्या परिपुर्ण अभ्यासाशिवाय गायक होत नाहीत ..Abstract अमुर्त गाचकाचा टॕग लावून फिरत नाहीत.
जासे मिरवणूक किंवा पब मधे नाचणारे ..Abstract अमुर्त डान्सर्स चा टॕग लावून फिरत नाहीत ...

चित्रामधेतरी अमुर्त इतक्या सहज कसंकाय शक्य होइल?
लहान मुलांचा कॕनव्हासवर मांडलेला रंगांचा खेळ कितीही सुंदर वाटला तरी तो खेळच असतो...
त्याला अमुर्त चित्र हे नाव देऊन पळवाट काढता येत नाही ...हे कित्येक चित्रकारांनाच कळत नाही... आणि त्या लहानग्यांच्या त्या चित्रनामक खेळांची  प्रदर्शनंही भरवतात.

मुर्त चा अभ्यास केल्यानंतरच अमुर्त ....
First Learn the Reality ..then Express as an Abstract
         ..........bhavna.2018.

Saturday, June 16, 2018

चित्रकार आणि प्रसिद्धी ...


चित्रकार आणि प्रसिद्धी ...

तू...समोर दिसणारा राजकारण, टेलीव्हीजन , चित्रपटातील सेलीब्रिटीच्या निवासथानी जावं...
हो जाताना मात्र एक पोर्ट्रेट भेट नक्की घेउन जावी.
भेट देतानाचे काही क्षणचित्र काढायला विसरू नकोस.
 
आल्यावर आपले किती व कसे कौतुक झाले हे सर्वांना सांगावे.न विसरता फेसबूकलाही पोस्टावे.

एक दिवस सगळ्या सेलीब्रीटींच्या दिवाणखान्यात त्या महान चित्रकाराचे चित्र आहे अशी बातमी पसरेल...
आणि त्यानं रेखाटलेलं चित्र सेलिब्रिटी स्टोर रूम मधे कित्येक वर्ष पडीक असेलही ...
सो व्हॉट?
असुदेत....

दर्म्यान एस.एम्. पंडीत, राजा रवी वर्मा, दिनानाथ दलाल, बाबूराव पेंटर, वगैरे महाराष्ट्रातील महान चित्रकारांचे रेफरन्स घेउन तुझ्या चित्रांचा छापखाना वर्कींग मोड मधे ठेवावा.
ह्याने चित्रांचा ...इन शॉर्ट कलेचा दर्जा खालावेल.
सो व्हॉट? चलेगा ...
तू तेच वर्षोनवर्षे करत रहावे.

ज्यांना ज्यांना चित्र भेट दिलं आहेस त्यांना अवर्जुन तुझ्या चित्रप्रदर्शनाला बोलवावे.... त्यांना याव लागणार !
त्यांना तुझं कौतुक करावं लागणार ...ते करणार !!
बरं मिडीया ....हवीच ...ती ही येणार ...

जसे एक पैसा भविष्यात इतर पैशांना आपल्या जवळ खेचतो ..त्याप्रमाणेच एक प्रसिद्धी अनेक प्रसिद्धींना ..
प्रसिद्ध व्यक्तींना आपल्या जवळ आणते.

तू पदविधर नसलास तरी काय?
फेसबूकवर तसं नमूद करायचं नाही.
बिन्धास्त जे.जे. स्कूल अॉफ आर्ट चे नाव सांगायचे.
कोणीही तुझ्याकडे सर्टिफीकेट मागणार नाही.

हो त्यामुळे अनेक पदवीधर होतकरू चित्रकार रसत्यावर फुकट पडलेल्याचं फिलींग लोकांना येइल ...
इतर चित्रकारांकडे तेच लोक फुकट कलेची अपेक्षा करतील.
सो हॉट?
करूदेत ....

कदाचित एखादा गरिब पदविधर चित्रकार हताश होइल ...होउदेत.
कदाचित एखादा गरिब पदविधर प्रतिभाशील चित्रकार हताश होइल ...होउदेत.

कदाचित कित्येक वर्षापुर्वीचं त्याच स्वप्न ..
 " मी मोठा नामवंत कलाकार होइन " हे स्वप्न अधुर राहील.... आणि तो एके दिवशी कला क्षेत्र सोडून गेलेला असेल.
पण तुझंही स्वप्न तेच आहे.... विसरू नकोस.
फरक फक्त पाच वर्षाचा ..पदवीचा आहे ...
फरक फक्त पदवीचा आहे.

मला माहितीय तुझी चित्र नक्कल आहेत ..
सो व्हॉट?
इतरांना काय कळतय?
थोडासा फेरबदल कर आणि वीक ...
नवीन कोरं घडवायचं पदवीधर चित्रकारांच काम आहे ...
आपलं काम नाही ते ...

तू नामवंत लोकांना चित्र फुकट मिळवायची सवय लावलीस ...पण ही तू तुझी केलेली जाहीरात त्या गरीबाला महाग पडेल ...
सो व्हॉट?
 पडूदेत महाग ...
तो मैदन सोडून जाइल आणि तुझा मार्ग मोकळा झालेला असेल....

एक अंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार म्हणून लोक तुला ओळखतील ...

आणि फोटोत सेलीब्रिटीच्या गालावर हसू नसूनही
बातमीत हेडलाइन झळखेल ...
" एक अनोखा चित्रकार जिनके बीग.बी. है दीवाने "
    
( हे सध्याचे कलेतले एक वास्तव मांडायचा माझा प्रयत्न आहे. कोणत्याही ठरावीक कलाकाराबद्दल माझं मत नाही).
               .....Bhavna Sonawane.2018.

Wednesday, April 4, 2018

अजनबीसी


अंजानी मंझील
अंजानीसी गलियाँ
 वो राह अंजानी
अंजानी उन सुर्खीयोमें
अजनबी तुम ..अजनबी हम ...

इक ख्वाब अधुरासा
इक शाम धुंदलीसी
वो बढ रहा अंधेरा
वो खत्म हो रहा ...सुरज कहीं ...

उन आजनबियोंके बीच
कुछ जाना कुछ पहचानासा ...
इक खिलखीलाता चेहरा ...
वो मासूम झिंदगी ...

इक मासुम अब तैयार खडी
अन्जानी राह पर ..
अन्जाने सफर की ओर
इक अजनबीसी l
            ......bhavna

Monday, March 5, 2018

वृद्धाश्रम ...

माझ्या एका सिनीयर मित्राच गावी  वृद्धाश्रम आहे.
मी म्हट्लं त्यांना ...
म्हातारपण आल की मी येते रहायला.
माझ्या वयाच्या मित्रमैत्रिणींमधे ...
एक गँगच जणु..

बस समोर एक झाड हवं पारिजातकाचं ... शुभ्रकेशरी नाजुकतेनं बहरलेलं ..हसवणारं.
शेजारीच सावली देणारं दाट मुळ असलेलं एखादं झाड हवं ... थकलेल्या मनाला सामावून घेणारं
काही वेलीही ... एकमेकांना निस्वार्थ गुंफत जगणारं.

तो आनंदात म्हणाला की  ...हो ये की...
ती एक खोली तुझी वाट पाहील खरी.
मी म्हट्लं ... पण शेवटपरियंत मला काम करायचय ..
रंगात खेळायचय ...

हो तुला एक इझेलही देतो ...
रंगवत बस काय रंगवायच ते.

मग मी बाहेर एक बोर्ड लावेन ...
"आमच्याकडे एक सुंदर म्हातारी आहे जी चित्र काढते "
मग माझ्या वृद्धाश्रमासाठी लोक उत्सुक होतील.
गर्दीच गर्दी.

आणि खरंच ..त्याने ते वृद्धाश्रम माझ्यासारख्या वेड्यांसाठी नैसर्गिक रित्या सजवायला घेतलय...असं ऐकलय !
               ......bhavna.2018.

Wednesday, January 3, 2018

निळा

रंग निळा शाईचा ....
जणु मनसोक्त लिहीत जावं

निळा रंग तो आकाशाचा ...
जणु एखाद्याने स्वच्छंद आभाळभर पसरावं

निळा तो रंग पाण्याचा ....
निखळ जगणं होउन सर्वांना सामावुन घ्यावं

रंग निळा तो ...
bhavna.2018.