Saturday, April 18, 2020

ऊन आणि उन्हाळा

उन्हाळा आला की झाडही आकसून जगू लागते ..
शीर अन् शीर... गरजे पुरतेच तेवढे शोषून घेते ते पाणी
अन् हळूच एक एक करत
आपली पानं ही झटकून देते...

माहीत असते त्याला पुढचा काळ कठीण असणार आहे
माहीत असते त्याला पुढचा काळ खूप कठीण असणार आहे
आता पाणी पाणी करत जगणं त्याला तरी कुठे परवडणार आहे...

उन्हात ठेवलेल्या कुंडीत सापडेल त्या सावलीचा मागोवा घेत...
कधी सूर्याला फसवतं
कारण आता पाणी पाणी म्हणत जगणं परवडणारं नसतं.

त्या सुकत चाललेल्या मातीचा ओलावा सांभाळत...
त्या सुकत चाललेल्या मातीचे मन राखत...
मिळेल तेवढेच माझे म्हणत जगताना पाहिलेय मी 
त्या मातीत स्वतःला घट्ट रोवून घेताना पाहिलय मी

पावसाची चाहूल घेत...
आकाशाकडे टक लावून शांत चित्ताने जळत... करपत...
त्या थंडगार थेंबांची वाट पाहत
उभ असतं ते झाड सकाळ दुपार अन् रात्रीही...

आणि त्याच वेळेस माणूस मात्र...
स्वतःचाच अंत शोधण्यात गर्क असतो...
      .... bhavnasonawane. april.2020.