Tuesday, November 24, 2015

तू नाहीस ....

आयुष्य सुखांनी नटलेलं ....
आणि  त्यात  तू नाहीस

दूरदूर खोलवर तुझ्याच आठवणींनी  बहरलेलं ...
पण तू नाहीस

तो ..ती. ..हा..ही ...सर्वांनीच व्यापलेलं ...
अरे !  तू नाहीस

एकएक क्षण ..वाट  पाही मन...
का कुणास  ठाऊक
तू नाहीस ...

फुलाफुलांवरून भिरभिरणारं
मोहक सुगंध पसरवणारं माझं मन...
त्यात तू नाहीस ?

पुस्तकाचं पान उलगडावं तसा
'तू' उलगडत जातो आहेस

अवतिभवती माझ्या
सारं सरं 'तू' आहेस.
                bhavna. nov. 24.2015

Sunday, November 15, 2015

' paris ' माझ्या आगामी पुस्तकाची ही पहिली ओळख.

 
2007 साली मी अनुभवलेल पॅरीस...
विविध कलांनी नटलेलं हे शहर.
जगातील प्रत्येक कलाकाराने एकदातरी भेट द्याव असं हे शहर..
कला आणि विज्ञानाचं सुंदर एकत्रिकरण असलेलं हे शहर ...
प्रत्येक गल्लिबोळाचं वैशिष्ठय असलेलं हे शहर ...

शहराच्या मधोमध वाहणारी सिएन नदी ...
त्या कडेने चालत राहा ...
विंडो शोॅपिंग करा ...
शनिवार च्या ओपन मार्केटना भेट द्या ...
छोटीमोठी कला दालनं पाहत फिरा ...
रसत्याकडेने विकत मिळणारी पुस्तकं चाळा ...
माझ्या चित्रांमधून वेळ मिळाला की हेच काय ते काम.

निटनेटकं असं हे शहर...छान प्लॅनिंग ...
एखादी महत्वाची इमारत गर्दीत अशी रचलेली आढळेल की लांब गेल्यावरही स्पष्ट दिसत असेल.

दुरवर कुठेही गेलं तरी आकाशात डोकावणारं ते Eifiel tower ...
ती छबी मनामध्ये घर करून राहिली ... भारतात परतल्यावर आजही एखादं टाॅवर मला tour eifiel ची आठवण करून देतं.

शनिवारी नदीच्या काठी गीटार , मित्रमैत्रीणी , वाईन आणि रात्रभर चालणार्या गप्पा.
सकाळसंध्याकाळ माझ्याच इमारतीत सुरू असलेला पियानोचा रियाज ...
दर अठवड्याला होणारे गायन ..वादन.. नृत्य...
जगातील विविध देशातील कलाकार ...
हे सर्व अनुभवायला माझ्यासाठी अडीच महीने खूप कमी होते.

कधी प्यायला मिनीरल वाॅटरची गरज भासली नाही ..
स्वच्छ  रसते ...
रसता चालत क्राॅस करणार्याला मान देणारी वाहने...
खेळणीची दुकानं लाकडी चाविच्या खेळणींनी भरलेली ..
रसत्यावरून मालकांसोबत मास्क लाउन फेरफटका घालणारे कुत्रे ..
स्केट्शूज घालून फिरणारी फ्रेंच माणसे ...

वयस्क सहसा फक्त फ्रेन्च बोलत ..जणु इंग्रजी येतच नाही.
पण तरूण पिढीमध्ये ही औपचारिकता  कमी  दिसली.

कोणत्याही कलाकाराला हवंहवस वाटेल असा हा अनुभव
आणि प्रत्येक मनुष्याला ओढ लागेल असं हे वातावरण...
माझं ड्रीम कला महाविद्यालय , Ecole art de Beaux देखिल काही दिवस अनुभवायला मिळालं .
तेथील लायब्ररी मध्ये एक संपुर्ण कपाट भारतीय कलाकारांनी व्यापलेलं पाहून मन भारावलं.
पॅरीस ...जगातील महत्वाचं  कलेचं प्रेरणास्थान ..

म्युझी दी लुव्र , म्युझी दी ऑरसे , पोॅम्पीड्यू , पिकासो म्युझियम ..
हे सर्व पहायला मी  सियन नदीकाठून चालत जायची ...
तेथे पोहोचेपरियंत नेहमीच स्वप्नमय वाटायचं .
परतिच्या वेळी त्या कलाक्रूतींमध्ये मन अगदी एकरूप होउन गेलेल असायचं.
रात्री इथल्यागत तिथं अंधार झालेला दिसला नाही.
काही दिवसातच 'सातच्या आत घरात' हा नियम मी मोडीस लावला.
उशीरा परतताना वाटणारी भितीही नाहिशी झाली होती.

हे असं एक शहर
ज्याने अशी अमानुषता कधीही पाहिली नसावी ...
त्या शहरात कोणी अशी क्रूरता करेल ही कल्पना देखील असहय्य आहे.
                                         ........bhavna sonawane .2015.