Wednesday, December 12, 2018

फ्रेम

अचानक एका प्रिय कुटूंबाला एक जलरंग चित्र गिफ्ट करायच ठरावं ...
मग गावात चौकाभोवती साधारण एक किलोमिटर गोलगोल फिरून कोपर्यात एक देवचित्रांचा फ्रेमर सापडावा ...
त्यातल्या त्यात कमीतकमी सोनेरी फ्रेम नक्की करावी...
बरं ..फ्रेमर आपला नेहमीचा नाहीय हे चक्क विसरून त्याने सांगितलेली किंमतीलाही होकारार्थी मान हलवावी आणि आपण तासभर भट्कून येइस्तोवर त्याने फ्रेमच्या पट्ट्या कापून ठेवाव्यात ..काच साफ करून ठेवावी.
आपण येताच ते इंपोर्टेड हॕन्डमेड कागदावरचं नाजूक चित्र त्या फायबर फ्रेम व काच मध्ये फीट करून चक्क खीळे ठोकायला सुरूवात करावी ...
आणि एक खीळा ठोकल्यावर आपल्याकडे पर्याय उरला नसल्याने मंदबुद्धी सारख त्याची फायबार पट्ट्यांवर खिळे ठोकमठोकी पाहत रहावी ...
नं त्याला हिंदी येतं ..ना मला तामीळ ...
नं त्याला हिंदी येतं ..ना मला तामिळ ...
फायबर समोर नीटनेटकं ...बाजूने दोनचार बाहेर आलेले खिळे त्याने सहज न्याहाळावेत ...
आपण अजूनही मंद प्रमाणे त्याचं काम पाहत रहावं ...
त्याने एक काळी एक इंची टेप काढावी आणि खिळे ..पट्टीचे क्रॕक लपवावे ...
समोरून फायबर ..बाजूने ..मागे काळी टेपची पायपींग ...
भल्तच सॕटीस्फाइड नजरेने त्याने ते फ्रेम्ड चित्र आपल्या हाती सुपूर्त करावं ...
नं त्याला हिंदी येतं ..ना मला तामीळ ...
                           ......bhavna.2018.dec