वर्ष २००४ ..०५... मी चित्रकला महाविद्यालय मध्ये असिस्टंट लेक्चरर होते तेव्हाची एक आठवण.
माझ्या ए.टी.डी. वर्गात सर्वच विद्यार्थी एकमेंपेक्षा भिन्न तरी वर्गाची एकी होती. मागे कोपर्यात एक शांत स्वभावाची मुलगी बसायची. 'ती' साधी निटनेटकी आणि सर्वात प्रामाणिक होती. इतकी की सकाळी वर्गात करायला दिलेली तिची असाइन्मेन्ट बर्याचदा संध्याकाळी पुर्ण झालेली असयची. त्या गडबडीत तिचं बरचस काम छान होत नसून बरं व्हायचं.
कधी सुट्टी न घेणारी मुलगी एक दिवशी वर्गात दिसली नाही.कॉलेज परिसर तसा लहानच .नेमकं तिला कोणीतरी स्टेशन जवळ मित्रासोबत फिरताना पाहिलं होतं. दुसर्या दिवशी आम्ही शिक्षकांनी तिची थोडी फिरकीही घेतली.
तिचं प्रेम तिच्या अप्पांना माहीत होतं. त्यांनी शिक्षण झाल्याझाल्या त्या मुलाशी लग्न कृरून द्यायचं ठरवलच होतं. बस ह्या गोष्टीत आणखी काय हवं होतं ?
त्या वर्षी मी ती नोकरी सोडली आणि वार्षीक परिक्षेआधीच सोडली. परिक्षा झाल्या आणि ए.टि.डी. च्या मुलांशी बरीच वर्ष काही बोलणंच झालं नाही.
आज अचानक तेथील विद्यार्थी आठवले ...'ती' आठवली....
असंच एकदा एका विद्यार्थयाकडून कळालं ...नंतर अप्पांनी तिचं लग्न त्या मुलाशीच करुन दिलं . एक मुलही झालं ...आणि अवघ्या दीड ..दोन वर्षात एक दिवशी तिला तिचा नवरा व सासरच्या माणसांनी जाळून ठार मारलं. मला खरतर रहावलं नाही पण ती घटणा घडून दोन वर्ष झाली होती. आणि कित्येक वर्ष मला खरंच वाटत नव्हतं . आजही अशा घटणा आपल्या अवतिभोवती घडताहेत ह्यावार विश्वास नव्हता.
ती इंस्टिट्यूट आठवली ...मी शिक्षिका आठवले ...तो वर्ग ..ते बारावी पुर्ण करुन ऐ.टी.डी. शिकत आसलेले विद्यार्थी आठवले. आणि मागे कोपर्यातला तिचा निरागस चेहराही आठवला.
असं कसं झालं ...का झालं ... ह्यापेक्षा इतक्या प्रामाणिक मुलीबाबतीत असं घडलंच कसं हा प्रश्न पडतो.
जे काम सांगू ते निमूटपणे करणारी ही मुलगी.
का तिच्या जगण्यात तिची प्रामाणिकता आड आली ... माहीत नाही
तिनं तिचं प्रेम ... पुर्वीच गुंडाळून ठेवायला हवं होतं.
मी पुर्वीपासूनच स्वच्छंदी मनस्वी ...
माझ्या विद्यार्थिनी बाबत असं काही घडावं ...हे दुःख !!
bhavna
No comments:
Post a Comment