Sunday, September 20, 2015

story of a life ...

आयुष्य कधी चिंब पाण्यात भिजवावं...
कधी एखादं पान उलगडाव .
साठलेली धुळ पुसून टाकावी
कुठे वाळवी दिसलीच तर तो भाग अलगद फाडून टाकावा ...

अवघड आहे , जगलेले क्षण आपल्यापासून असे मोकळे होणे
पण करावं...
मग जगण्यातला हलकेपणा जाणवेल
नवे पंख लावून पुन्हा उंच झेप घ्याविशी वाटेल
पाण्यातून कुठेतरी खोल पोहत जावंस वाटेल ...
मैलोंमैल चालावस वाटेल ...

कदाचित ते डोंगर ..दरी पार केल्यावर नवं गाव बसवावसही वाटेल ..
करुन पहावं
एक जगणं जगून झालं की नवं काही शोधावं
येतील त्यांना सोबत घ्यावं

एका ठिकाणी स्वास कोंडू लागला की पहाटेच निघावं..
एखाद्या लमाणी सारखं रंगीत होऊन पहावं...
मला माहित आहे तुला ते शक्य नाही
म्हणून निदान स्वप्नात रमावं
तिथेच हरवावं...
                                 ......bhavna

1 comment:

  1. Wow bhavna..ekdum lagte ga manala...sahi..hats off

    ReplyDelete