Saturday, May 23, 2020

एका गूलमोहराचे पत्र

' एका गूलमोहोराचे पत्र '

बघ ना सखे माझ्याकडे
मी फुलू लागलोय
तुझ्यासाठीच तर बहरून झुलू लागलोय.

अवतीभोवती पाखरांची किलबील तुझ्यासाठी
हिरवीकेशरी माझी सावलीही तुझ्याचसाठी

बस काही दिवसांची तर साथ आपली
पाऊस सुरू होताच सोडशीस तू वाट आपली

वेळोवेळी माझा बहर निरखून पाहतेस
तरी शेजारच्या त्या गुलमोहरावर जळजळ जळतेस

मी ही कधी खिडकीत डोकावून तुलाच पाहतो
दिवस दिवसभर तुझ्यासाठीच ग फुलू पाहतो

तुला ऊन बाधू नये म्हणून तर धडपडतो
आणि तू ही बोलतेस कशी ...
की मी त्या कोकीळेवर मरतो

एक हा बहर संपला की तू पाऊसपाऊस करत निघून जाशील
पण तू मला पुन्हा भेटावीस म्हणून मी येथेच उभा असीन

एक एक ऋतु पुढे सरकावा अन् तुला पाहण्याची आतुरता दाटू पाहते
आणि पुन्हा एकदा वसंतात तूझी नजर माझ्याकडे फिरू पाहते

बोल ना ग एकदा
माझ्यावर तुझे थोडे प्रेम आहे
बोल सखे एकदा
आपल्या प्रेमा अर्थच तर हा बहर आहे

सखे ...
बघ एकदा माझ्याकडे
मी फुलू लागलोय
पुन्हा बहरून तुझ्यासाठीच तर झुलू लागलोय
            .......bhavna.may.2020

No comments:

Post a Comment