Saturday, June 16, 2018

चित्रकार आणि प्रसिद्धी ...


चित्रकार आणि प्रसिद्धी ...

तू...समोर दिसणारा राजकारण, टेलीव्हीजन , चित्रपटातील सेलीब्रिटीच्या निवासथानी जावं...
हो जाताना मात्र एक पोर्ट्रेट भेट नक्की घेउन जावी.
भेट देतानाचे काही क्षणचित्र काढायला विसरू नकोस.
 
आल्यावर आपले किती व कसे कौतुक झाले हे सर्वांना सांगावे.न विसरता फेसबूकलाही पोस्टावे.

एक दिवस सगळ्या सेलीब्रीटींच्या दिवाणखान्यात त्या महान चित्रकाराचे चित्र आहे अशी बातमी पसरेल...
आणि त्यानं रेखाटलेलं चित्र सेलिब्रिटी स्टोर रूम मधे कित्येक वर्ष पडीक असेलही ...
सो व्हॉट?
असुदेत....

दर्म्यान एस.एम्. पंडीत, राजा रवी वर्मा, दिनानाथ दलाल, बाबूराव पेंटर, वगैरे महाराष्ट्रातील महान चित्रकारांचे रेफरन्स घेउन तुझ्या चित्रांचा छापखाना वर्कींग मोड मधे ठेवावा.
ह्याने चित्रांचा ...इन शॉर्ट कलेचा दर्जा खालावेल.
सो व्हॉट? चलेगा ...
तू तेच वर्षोनवर्षे करत रहावे.

ज्यांना ज्यांना चित्र भेट दिलं आहेस त्यांना अवर्जुन तुझ्या चित्रप्रदर्शनाला बोलवावे.... त्यांना याव लागणार !
त्यांना तुझं कौतुक करावं लागणार ...ते करणार !!
बरं मिडीया ....हवीच ...ती ही येणार ...

जसे एक पैसा भविष्यात इतर पैशांना आपल्या जवळ खेचतो ..त्याप्रमाणेच एक प्रसिद्धी अनेक प्रसिद्धींना ..
प्रसिद्ध व्यक्तींना आपल्या जवळ आणते.

तू पदविधर नसलास तरी काय?
फेसबूकवर तसं नमूद करायचं नाही.
बिन्धास्त जे.जे. स्कूल अॉफ आर्ट चे नाव सांगायचे.
कोणीही तुझ्याकडे सर्टिफीकेट मागणार नाही.

हो त्यामुळे अनेक पदवीधर होतकरू चित्रकार रसत्यावर फुकट पडलेल्याचं फिलींग लोकांना येइल ...
इतर चित्रकारांकडे तेच लोक फुकट कलेची अपेक्षा करतील.
सो हॉट?
करूदेत ....

कदाचित एखादा गरिब पदविधर चित्रकार हताश होइल ...होउदेत.
कदाचित एखादा गरिब पदविधर प्रतिभाशील चित्रकार हताश होइल ...होउदेत.

कदाचित कित्येक वर्षापुर्वीचं त्याच स्वप्न ..
 " मी मोठा नामवंत कलाकार होइन " हे स्वप्न अधुर राहील.... आणि तो एके दिवशी कला क्षेत्र सोडून गेलेला असेल.
पण तुझंही स्वप्न तेच आहे.... विसरू नकोस.
फरक फक्त पाच वर्षाचा ..पदवीचा आहे ...
फरक फक्त पदवीचा आहे.

मला माहितीय तुझी चित्र नक्कल आहेत ..
सो व्हॉट?
इतरांना काय कळतय?
थोडासा फेरबदल कर आणि वीक ...
नवीन कोरं घडवायचं पदवीधर चित्रकारांच काम आहे ...
आपलं काम नाही ते ...

तू नामवंत लोकांना चित्र फुकट मिळवायची सवय लावलीस ...पण ही तू तुझी केलेली जाहीरात त्या गरीबाला महाग पडेल ...
सो व्हॉट?
 पडूदेत महाग ...
तो मैदन सोडून जाइल आणि तुझा मार्ग मोकळा झालेला असेल....

एक अंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार म्हणून लोक तुला ओळखतील ...

आणि फोटोत सेलीब्रिटीच्या गालावर हसू नसूनही
बातमीत हेडलाइन झळखेल ...
" एक अनोखा चित्रकार जिनके बीग.बी. है दीवाने "
    
( हे सध्याचे कलेतले एक वास्तव मांडायचा माझा प्रयत्न आहे. कोणत्याही ठरावीक कलाकाराबद्दल माझं मत नाही).
               .....Bhavna Sonawane.2018.

No comments:

Post a Comment