Tuesday, June 16, 2015

Gulmohar

आज पुन्हा एकदा
पाऊस नभी ढाटलेला
त्या वळणावर
तो गुलमोहर
चिंब भिजाया आसुसलेला !
               bhavna 2014.

Saturday, June 6, 2015

वाट ती मरणाची

आठवाविशी वाटतात
पुन्हा ती पावलं
चालावस वाटतं
पुन्हा त्या रसत्यानं ...

अनुभव घ्यावासा वाटतो
त्या अवखळ बालपणाचा
जीव द्यावासा वाटतो
त्या खडतर मोठेपणाचा

म्हणून शोधतेय मी वाट त्या मरणाची
पुन्हा जन्म घेऊन
लहान म्हणून वावरण्याची !!
             bhavna 1995

Monday, May 25, 2015

अधुरं

एक स्वप्न अधुरंच रहावं
राहूनराहून आठवावं
आठवणीतून जपावं 
जगणं होऊन जगावं !
          ...bhavna.may2015.

Thursday, May 7, 2015

भेट एकदा ....

पाऊस जरा भेट ऐकदा ....
मोर पिसारा होऊन भेट
बेधुंद वारा होऊन भेट
गार गारा होऊन भेट
फक्त माझा होऊन भेट
भेट एकदा....
             .....bhavna 2015.may.

Sunday, March 29, 2015

' तू '


 उथळ पाण्यासारखा संथ कधी तू
झर्यासारखा कधी खळखळणारा

मनसोक्त भिजवणारा पाऊस कधी तू
चिंब भिजूनही कधी कोरडा वावरणारा
 
लाटांमध्ये वाहून नेणारा समुद्र कधी तू
मेघ जसा कधी मनसोक्त बरसणारा

बरफाळलेल्या नदीसारखा शांत कधी तू
एक दुष्काळ कधी मन माझं जाळणारा

खोल  किती आहेस तू जाणीवही न देणारा
तु हा असा... कधी तू तसा ....

आणि हो... डोळ्यातील अश्रुही तू
क्षणोक्षणी ओघळणारा.
                     .....bhavna
                         feb 2015.

Thursday, March 5, 2015

रंग....


पुरवी एकदा एका लमाणिन ला पाहून वाटल होत
आपणही होउ असे रंगीत प्राणी कधी....
तो रंगीत घागरा
ते रंगित दागिणे पाहून मन भारावून जायचं...
 केमिस्ट्री लॉब मध्ये कधीतरी फ्लूरोसंट कलर दिसायचे
त्याचही आकर्षण होतं
कालांतराने हातामध्ये रंग पेटी आली
आणि पहिलं प्रेमही रंगांवरच जडलं
रंग शिकत असतानादेखील रंगपंचमीची  ओढ होती
तातपुरत रंगीत प्राणी झाल्यागत वाटायच खरं
पण आता रंगांशी इतकी बांधली गेली आहे
की तेव्हाची रंगीबेरंगी मिरवून मन भरलं
झोपेतून उठलं की रंग
झोपायच्या आधीही रंगच
पाणी समझून कधी ब्रश पाण्यात असतो
कधी बिसकीटच पाण्यामध्ये तरंगत असतं
सध्या माझं जग ईतक रंगमय झालं आहे
की पुढे आयुष्यात इतर गोष्टी उरो न उरो 
 ........उरतील ते रंगच .
                           .......bhavna march 2015.