Tuesday, December 10, 2019

सराव आणि वर्ष

आधी साधा कार्ट्रीज कागद ..आधी कटरने टोक केलेली  पेनसील ..त्यानंतर कागदांचे विविध पोताप्रमाणे प्रकार ..सराव ...
कला अनुसरून वेगवेगळ्या विषयांचा भडिमार ...
सोबतीला विविध रंग व रंगलेपन माध्यमं ... 
आणि हे सतत रोजचे साधारण पाचसात तास ...
कसंतरी सरणारं पहिलं वर्ष ...

तरी पुढेही पेन्सील घासूनघासून केलेला सराव ..
वर सराव कमी पडत असल्यामुळे शिक्षकांची बोलणी ..
 तीनएक वर्ष हीच विद्यार्थी दशा ...

नंतर कधीतरी कॕनव्हास .... कॕनव्हास म्हणजे थोडसं प्रोफेशनलीझम पाळण्याइतपत आपली लायकी होत चालल्याचे समाधान.
तेव्हा अधूनमधून शिक्षकानी थोपटलेली पाठ ..

तरी ..आपण अजून चित्रकार नाही हं ...
एकदाचे शिक्षण संपले.
आणि आजही कुठेतरी कलेचा विद्यार्थी म्हणून कलेची अर्धवट जाणवत राहणारी उपासना ...
आता सराव आहेच पण भितीनेही ती पेनसील पुनः हाती घ्यायला भाग पाडतो मी ..

आजही मी अपुर्ण ..
ते अपुर्णत्व नव निर्मिती करायला भाग पाडत.

आणि अशा वेळेस
 कोणीतरी युट्यूब विद्यारथी भारीच शॉर्टकट मारून आपल्याला जेव्हा कलेचे लेसन देतो ...
तेव्हा समोरच्याचे म्हण्णे नुसते ऐकत रहावे ..

मज्जा येते नै !!
                     ...... Bhavna Sonawane.

Monday, November 11, 2019

ती कापलेली फांदी

त्या स्वच्छंदी झाडाला समजावलं
त्याची फांदी कापली
अन्
झाडानेही आकसून घेतलं स्वत:ला ..

हो ..इतरांनाही जगू द्या म्हणत...
तेथील विस्तार काही काळ थांबवत
स्वत:ची वाढ न खुंटता ..

माणूस मात्र मी मी म्हणत ...
विस्तारत चाल्लाय ..
प्रगतीच्या नावावर !
              bhavna.november.2019.

Saturday, October 5, 2019

आरे ..Aarey

सांग देवा कसंकाय विसरायचं ...

जगण्यातील बरेच आनंदी ...

आरेतील सावलींनी व्यापलेले हे क्षण....
कोपर्यातील एक उरलीसुरली आठवण ..

त्या डांबरी रसत्यांवरील वीसपंचवीस चा स्पीड ..
सुरूवातिची विजय सुपर ...
तर् नंतरची पद्मिनी फियाट ...
बस हेच काय ते अंधूक अंधूक ...

आणि त्या पसरलेल्या  सावलीमय रसत्यावर
कधी सांडलेली शुभ्र कामिनी
तर् कधी पिवळा केशरी गुल्मोहर !
                           .....bhavna.2019.5sept.

Wednesday, September 18, 2019

Thursday, August 8, 2019

जीवन

नखा एवढा जीव माझा ...
त्याच्या गरजा त्या किती !
जीवन आहे तोवर मौज ...
मरणोत्तर माती !!!
      ....bhavna. 2013.

Saturday, July 6, 2019

पाऊस आणि गोकर्ण


उन्हाळ्यात खूप खूप बिया आल्या 
काही काढल्या
काही मातीत स्वतः पडून रुजू झाल्या
तरी वेलीवर काही उरल्याच

पाऊस सुरू झाला
तशी कुजायला सुरूवात झाली
पण बियांची देखील जीद्द न्यारी

 मिळेलपाणी जोवर
 तशाच अवस्थेत तोवर
नव्याने झुलत रहायचे म्हणताहेत

एवढे धीट ...
एक एक सुटं कर ..
नी रूजायला जागा कर
आता मलाच खुणावताहेत !
          ...... bhavna.

Monday, June 17, 2019

Chantal Jumel ही माझी फ्रेच मैत्रीण. हिच्या चित्रांमध्ये मला माझा भारत नव्याने सापडतो.

 चांतलशी माझी ओळख साधारण चार वर्षांपुर्वी तामिळनाडूच्या तिच्या चित्रप्रदर्शनात झाली.
पातळ लाइफसाइज राइसपेपरवर लालसर पेन नी संपुर्ण  ओँकार .. त्यातच आकार ..माणसे .. प्राणी पक्षी ..पाणी ..आकाश ... सहसा बहाय्य रेश नाही ..

टिपीकली फ्रेंच शरिरयश्टी तरूणपणात 1980 मध्ये दक्षिण भारतात राहून शास्त्रोक्त पद्धतिने कथकली नृत्याचे शिक्षण .. लेखन ... तसेच कालांतराने चित्रणही ..करत असलेली चांतल.

चित्रात कुठेही बटबटीतपणा नाही ... लय ..ताल .. एकसंघता .. सुसंगती .. किती साधेपणाने दर्शविते .. तरी चित्र संपुर्ण वाटते.

जितकं नाजूक ..लयदार .. तितकच प्रभावी  ...
जरी  शांत ..तरीही  फिरत्या रेशा ...

कुठेही आकारांचा दिखावा नाही ..सरळ साधेपणाने जसे भावले तसे रचलेले आकार ...

 I am basically a writer म्हणत चांतलने तिची ओळख सांगितली होती. अर्थकलर मधला चुढीदार ...ओढणी ..मोठे रिंगा व कधीकधी टिकली हा तिचा पहराव.

काही वेळाने  एकच अक्षर गिरवत गिरवत मला मेडिटेटीव  फिलींग येतं म्हणाली .. आणि तो राइसपेपरही असाच व्यापला जातो.
हे सुरूवातीला साधं वाटलं तरी लक्ष ....दशलक्ष वेळा ओँकार लिहीणं ..म्हणजे नकळत तेवढा उत्चारणंही आलंच.

आणि समोर त्या पातळ राइसपेपर च्या पोतावर दिसू लागतं ते भारताचंच रूप.

चांतल वर्षातील काही महीने तामिळनाडूत राहते तर काही महिने फ्रांस ला असते . भारतात पारंपारीक दाक्षिणात्य ठिपक्यांची  रांगोळी चा अभ्यास करते ..ते देखील अगदी लयीत तिच्या चित्रांमध्ये उतरवते .. तर फ्रांसमध्ये घराच्या बगिच्यातील फुलझाडांमध्ये स्वतःला वाहून देते.

किती छान वाटतं ना हे ऐकायला .. एखाद्या कलाकाराचे आयुष्य ..मस्त जणु भिरभीरणारं ..पण  प्रत्येक बहाय्य सुंदर दिसणार्या कलेच्या मागे साधना व खडतर प्रवासही  असतो.
त्याच्या साध्या सरळ निर्मळ आकारात व अल्हाददायक रंगात जणु तो आयुष्याचा खडतरपणा लुप्त होतो...

खरंच आपल्यातला हरवत चाललेला भारत कधीकधी अभारतीय कलाकारांमध्ये नव्याने  सापडतो.
 ....... Bhavna Sonawane