Tuesday, September 18, 2018

अमूर्त चित्र.. a thought

जसे नृत्य ...गायनाला शास्त्र आहे ..गीत व कवितेलाही .. तसेच चित्रकलेला ठराविक शास्त्र आहे.
चित्र त्या नियमांना धरूनच पुर्ण केलं जातं.
चित्रकाराला व चित्र पाहणार्याला त्या शास्त्राद्वारे जो आनंद मिळतो ..तेवढच त्या चित्राचे कार्य आहे....त्यात प्रयेकाला गूढ काहीतरी सापडावं असं काहीच नसतं.
पण तरी तो आनंद कितीही सोप्पा वाटला तितकाच अवघड... प्रत्येक चित्रकाराची त्याच्या आवडी व अभ्यास ..सरावाप्रमाणे एक विशिष्ठ शैली असते... आणि त्याच सहाय्याने तो ते ठराविक भाव सहज आपल्या चित्रात उतरवतो.

कोणतिही कला असो ...ते शास्त्र ..नियम प्रात्यक्षिक आणि वैचारिक दोन्ही असतात ..काही ठराविक वय गाठल्यानंतरच पदरी पडतात.
तोपर्यंत त्या कलाकाराने कटपुथली प्रमाणे स्वतःला आपले शिक्षिक सांगतिल त्याप्रमाणे अभ्यासात झोकून द्यायचे.
जसे बाथरूम सिंगर त्या परिपुर्ण अभ्यासाशिवाय गायक होत नाहीत ..Abstract अमुर्त गाचकाचा टॕग लावून फिरत नाहीत.
जासे मिरवणूक किंवा पब मधे नाचणारे ..Abstract अमुर्त डान्सर्स चा टॕग लावून फिरत नाहीत ...

चित्रामधेतरी अमुर्त इतक्या सहज कसंकाय शक्य होइल?
लहान मुलांचा कॕनव्हासवर मांडलेला रंगांचा खेळ कितीही सुंदर वाटला तरी तो खेळच असतो...
त्याला अमुर्त चित्र हे नाव देऊन पळवाट काढता येत नाही ...हे कित्येक चित्रकारांनाच कळत नाही... आणि त्या लहानग्यांच्या त्या चित्रनामक खेळांची  प्रदर्शनंही भरवतात.

मुर्त चा अभ्यास केल्यानंतरच अमुर्त ....
First Learn the Reality ..then Express as an Abstract
         ..........bhavna.2018.

Saturday, June 16, 2018

चित्रकार आणि प्रसिद्धी ...


चित्रकार आणि प्रसिद्धी ...

तू...समोर दिसणारा राजकारण, टेलीव्हीजन , चित्रपटातील सेलीब्रिटीच्या निवासथानी जावं...
हो जाताना मात्र एक पोर्ट्रेट भेट नक्की घेउन जावी.
भेट देतानाचे काही क्षणचित्र काढायला विसरू नकोस.
 
आल्यावर आपले किती व कसे कौतुक झाले हे सर्वांना सांगावे.न विसरता फेसबूकलाही पोस्टावे.

एक दिवस सगळ्या सेलीब्रीटींच्या दिवाणखान्यात त्या महान चित्रकाराचे चित्र आहे अशी बातमी पसरेल...
आणि त्यानं रेखाटलेलं चित्र सेलिब्रिटी स्टोर रूम मधे कित्येक वर्ष पडीक असेलही ...
सो व्हॉट?
असुदेत....

दर्म्यान एस.एम्. पंडीत, राजा रवी वर्मा, दिनानाथ दलाल, बाबूराव पेंटर, वगैरे महाराष्ट्रातील महान चित्रकारांचे रेफरन्स घेउन तुझ्या चित्रांचा छापखाना वर्कींग मोड मधे ठेवावा.
ह्याने चित्रांचा ...इन शॉर्ट कलेचा दर्जा खालावेल.
सो व्हॉट? चलेगा ...
तू तेच वर्षोनवर्षे करत रहावे.

ज्यांना ज्यांना चित्र भेट दिलं आहेस त्यांना अवर्जुन तुझ्या चित्रप्रदर्शनाला बोलवावे.... त्यांना याव लागणार !
त्यांना तुझं कौतुक करावं लागणार ...ते करणार !!
बरं मिडीया ....हवीच ...ती ही येणार ...

जसे एक पैसा भविष्यात इतर पैशांना आपल्या जवळ खेचतो ..त्याप्रमाणेच एक प्रसिद्धी अनेक प्रसिद्धींना ..
प्रसिद्ध व्यक्तींना आपल्या जवळ आणते.

तू पदविधर नसलास तरी काय?
फेसबूकवर तसं नमूद करायचं नाही.
बिन्धास्त जे.जे. स्कूल अॉफ आर्ट चे नाव सांगायचे.
कोणीही तुझ्याकडे सर्टिफीकेट मागणार नाही.

हो त्यामुळे अनेक पदवीधर होतकरू चित्रकार रसत्यावर फुकट पडलेल्याचं फिलींग लोकांना येइल ...
इतर चित्रकारांकडे तेच लोक फुकट कलेची अपेक्षा करतील.
सो हॉट?
करूदेत ....

कदाचित एखादा गरिब पदविधर चित्रकार हताश होइल ...होउदेत.
कदाचित एखादा गरिब पदविधर प्रतिभाशील चित्रकार हताश होइल ...होउदेत.

कदाचित कित्येक वर्षापुर्वीचं त्याच स्वप्न ..
 " मी मोठा नामवंत कलाकार होइन " हे स्वप्न अधुर राहील.... आणि तो एके दिवशी कला क्षेत्र सोडून गेलेला असेल.
पण तुझंही स्वप्न तेच आहे.... विसरू नकोस.
फरक फक्त पाच वर्षाचा ..पदवीचा आहे ...
फरक फक्त पदवीचा आहे.

मला माहितीय तुझी चित्र नक्कल आहेत ..
सो व्हॉट?
इतरांना काय कळतय?
थोडासा फेरबदल कर आणि वीक ...
नवीन कोरं घडवायचं पदवीधर चित्रकारांच काम आहे ...
आपलं काम नाही ते ...

तू नामवंत लोकांना चित्र फुकट मिळवायची सवय लावलीस ...पण ही तू तुझी केलेली जाहीरात त्या गरीबाला महाग पडेल ...
सो व्हॉट?
 पडूदेत महाग ...
तो मैदन सोडून जाइल आणि तुझा मार्ग मोकळा झालेला असेल....

एक अंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार म्हणून लोक तुला ओळखतील ...

आणि फोटोत सेलीब्रिटीच्या गालावर हसू नसूनही
बातमीत हेडलाइन झळखेल ...
" एक अनोखा चित्रकार जिनके बीग.बी. है दीवाने "
    
( हे सध्याचे कलेतले एक वास्तव मांडायचा माझा प्रयत्न आहे. कोणत्याही ठरावीक कलाकाराबद्दल माझं मत नाही).
               .....Bhavna Sonawane.2018.

Wednesday, April 4, 2018

अजनबीसी


अंजानी मंझील
अंजानीसी गलियाँ
 वो राह अंजानी
अंजानी उन सुर्खीयोमें
अजनबी तुम ..अजनबी हम ...

इक ख्वाब अधुरासा
इक शाम धुंदलीसी
वो बढ रहा अंधेरा
वो खत्म हो रहा ...सुरज कहीं ...

उन आजनबियोंके बीच
कुछ जाना कुछ पहचानासा ...
इक खिलखीलाता चेहरा ...
वो मासूम झिंदगी ...

इक मासुम अब तैयार खडी
अन्जानी राह पर ..
अन्जाने सफर की ओर
इक अजनबीसी l
            ......bhavna

Monday, March 5, 2018

वृद्धाश्रम ...

माझ्या एका सिनीयर मित्राच गावी  वृद्धाश्रम आहे.
मी म्हट्लं त्यांना ...
म्हातारपण आल की मी येते रहायला.
माझ्या वयाच्या मित्रमैत्रिणींमधे ...
एक गँगच जणु..

बस समोर एक झाड हवं पारिजातकाचं ... शुभ्रकेशरी नाजुकतेनं बहरलेलं ..हसवणारं.
शेजारीच सावली देणारं दाट मुळ असलेलं एखादं झाड हवं ... थकलेल्या मनाला सामावून घेणारं
काही वेलीही ... एकमेकांना निस्वार्थ गुंफत जगणारं.

तो आनंदात म्हणाला की  ...हो ये की...
ती एक खोली तुझी वाट पाहील खरी.
मी म्हट्लं ... पण शेवटपरियंत मला काम करायचय ..
रंगात खेळायचय ...

हो तुला एक इझेलही देतो ...
रंगवत बस काय रंगवायच ते.

मग मी बाहेर एक बोर्ड लावेन ...
"आमच्याकडे एक सुंदर म्हातारी आहे जी चित्र काढते "
मग माझ्या वृद्धाश्रमासाठी लोक उत्सुक होतील.
गर्दीच गर्दी.

आणि खरंच ..त्याने ते वृद्धाश्रम माझ्यासारख्या वेड्यांसाठी नैसर्गिक रित्या सजवायला घेतलय...असं ऐकलय !
               ......bhavna.2018.

Wednesday, January 3, 2018

निळा

रंग निळा शाईचा ....
जणु मनसोक्त लिहीत जावं

निळा रंग तो आकाशाचा ...
जणु एखाद्याने स्वच्छंद आभाळभर पसरावं

निळा तो रंग पाण्याचा ....
निखळ जगणं होउन सर्वांना सामावुन घ्यावं

रंग निळा तो ...
bhavna.2018.

Sunday, November 5, 2017

एक बेडूक

एका बेडूकची गोष्ट

एक छोटासा बेडूक ...
खूपखूप पाऊस पडत होता ..
घराबाहेरच्या झाडाझुडपातच शेजारी एक डबकं पाण्याने तुडूंब भरलं होतं.
त्या बेडकाने त्यात खेळाखेळात उडी मारली ...
पोहत राहिला खेळत राहिला.
पाउस कधी कमी ..कधी जास्त असायचा ..पण पडायचा.
एकदाचा पाउस थांबला आणि डबक्यातलं पाणि सुकू लागलं.
बेडुक पावसाची वाट पाहत राहिला ...
आता मात्र त्याला बाहेर येता येइना !
frogs are damn cold blooded animals u see !
आता कोल्ड ब्लडेड चा अर्थ मला विचारू नका ..गुगल करा.
समाधी अवस्थेत बसल्यागत तेथे तसाच सुकला.
मला श्रिंक झालेला सापडला ..मी बाहेर मातीत ठेवला होता ... आता तिथून गूल झालाय !!!
                  ......bhavna
note : ही सिचुवेशन बर्यामाचदा माणसांमधेही आढळते.

Tuesday, May 30, 2017

वेंधळा तू...

नेहमीच वाट पहायला लावणारा तू ...
फसवणार म्हणालास नी वेळेवर आलास खरा
वेंधळा पाऊस तू...
केलेला वादा तूच विसरला खरा!

वेड्यांनी असं शहाण्यागत वागायचं नसतं...
मी आलोच सांगून... हळूच निसटून जायचं असतं!

त्याशिवाय तुझी आठवण काढेल का कोण...
त्या शिवाय तुझी वाट पाहील का कोण...
तू पाऊस वेंधळा खरा...!!
                            bhavna.